□ नव्या आयुक्तपदी शितल तेली-उगले यांची नियुक्ती
सोलापूर : महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांची अखेर नागपूर येथे वस्त्रोद्योग संचालक या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी श्रीमती शितल तेली-उगले (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Solapur. P. Shiv Shankar’s transfer brought joy, fireworks and sheetal telli in the trade union
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यानंतर सोलापूर महापालिकेचे बहुचर्चित आयुक्त पी शिवशंकर यांची अखेर बदली झाली आहे. नागपूर येथे वस्त्रोद्योगचे संचालक या पदावर श्रीमती शितल तेली-उगले (भाप्रसे) यांच्या जागी ते पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून केली आहे.
सध्याच्या पदाचा कार्यभार नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (२) यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा , असे आदेशात म्हटले आहे.नागपूर येथे वस्त्रोद्योगचे संचालक श्रीमती शितल तेली-उगले (भाप्रसे) यांची सोलापूरचे महापालिका नवे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरचा चेहरा मोहरा बदलला होता, शिवाय अन्य विकास कामे प्राधान्याने करून नागरिकांची मने जिंकली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पालिकेत फटाके उडवताना कामगार संघटनेचे अशोक जानराव आणि पोलिसांमध्ये वादावादीचा प्रसंग निर्माण झाला. पालिका आयुक्तांची बदली झाल्यानंतर महापालिका कामगार संघटना कृती समितीचे अशोक जानराव यांनी पालिकेच्या आवारात फटाके आणले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. एक कामगार संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये थोडवेळ वादावादीचा प्रसंग निर्माण झाला. वादावादी नंतर संबंधित पोलिसांनी आणखी पोलिसांची जादा कुमक पालिका आवारात मागून घेतली.
आयुक्त पी शिवशंकर यांचे मिळकत कर रिविजन, सार्वजनिक नळ तोड मोहीम, कर्मचाऱ्यांवर कारवाई यासह काही निर्णय वादग्रस्त ठरले होते. दरम्यान काही महिन्यापूर्वी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयुक्त पी शिवशंकर यांच्या बदलीसाठी मोर्चाही काढला होता. अनेक वेळा पी शिवशंकर यांची बदली झाल्याची अफवा उठत होती. अखेर आज गुरुवारी शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
□ प्रशासकीय राजवटीत 374 केले ठराव
सोलापूर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. दरम्यान या राजवटीत आतापर्यंत 374 एकूण ठराव महापालिका आयुक्त शिवशंकर यांच्या काळात झाले.
सोलापूर महापालिकेत लोकप्रतिनिधींची मुदत मार्च महिन्यामध्ये संपली. त्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू झाली. प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त पी शिवशंकर हेच जबाबदारी पार पाडली. मार्च ते आत्तापर्यंत झालेल्या प्रशासकीय उपसमितीच्या बैठकांमध्ये एकूण 374 ठराव करण्यात आले.
यामध्ये सर्वसाधारण विषयी 184 ठराव करण्यात आले. स्थायीचे – 141 , स्थापत्यचे – 18 आणि परिवहनचे – चार असे एकूण 374 ठराव करण्यात आले आहेत. प्रशासकीय कारकीर्दीत पाणी मीटर, बिलिंग, रिविजन यासह विविध वैशिष्ट्यपूर्ण कामांना गती देण्यात आली. मोठे 33 विकास कामांचा यामध्ये समावेश आहे, असेही महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले.