बार्शी : बार्शी येथील झाडबुके महाविद्यालयात शिकत असलेली मुलगी कॉलेज संपवून मामासोबत दुचाकीवरून गावी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकटर ट्रॉलीची धडक बसली. यात भाचीचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. Collision with two-wheeled trolley; Onion pick-up overturns death of niece who was about to go to village with uncle, three killed in Karjat
सानिका नारायण दिवटे (वय 17 रा .सिरसाव ता.परांडा) असे मृत मुलीचे नाव आहे. खाली पडल्याने तिच्या डोकीस जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि 15 ) दुपारी 12 च्या सुमारास बार्शी तालुक्यातील कांदलगाव रोडवरील करडे वस्ती नजीक असलेल्या नागोबा मंदिराजवळ घडली. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मयताची नोंद झाली आहे.
मयत मुलगी ही येथील झाडबुके महाविद्यायत आर्टस् विभागात 11 वीत शिकत होती. या दिवशी कॉलेज संपवून सिरसावगावी मामासोबत दुचाकीवर बसून जात होती. पाठीमागून येणाऱ्या ट्रक्टर पुढे जात असताना तिच्या डोकीस ट्रॉलीची जबर धडक बसली. दुचाकीसह खाली कोसळताच तिच्या डोकीस जबर मार लागून गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडली. तिचा मामाही धडकेने कडेला असलेल्या शेतात पडला होता. तातडीने तिला एका वाहनातून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच मयत झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने घोषीत केले.
अपघाताची माहिती पोलिसांना समजताच दवाखान्यात जाऊन अकस्मात मयत नोंद केली. रात्री शवविच्छेदन होताच तिचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला. तर पोलिसानी घटनास्थळी जाऊन
पहाणी करताना चालक वाहन सोडून पसार झाल्याने पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● कांदा घेऊन निघालेला पीकअप पलटी, तिघांचा मृत्यू
मोहोळ : कोळेगाव (ता. मोहोळ ) पाटीजवळ कांदा घेवून निघालेला पीकअप जीप पलटी होवून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. हे तिघे कर्जतमधील होते.
कोरेगाव ( ता. कर्जत ) येथून (एम एच १६ ए वाय २६७४ ) या क्रमांकाचा पीकअप जीप सोलापूर येथील मार्केट यार्ड येथे कांदा घेवून निघाला होता. तो मोहोळ सोलापूर दरम्यान मोहोळ पासून आठ कि मी अंतरावर असलेल्या कोळेगाव पाटीजवळ उताराला लागला असता मागील टायर फुटल्याने तो पलटी झाला.
हा अपघात काल बुधवारी (ता. 16) रात्री दीड वाजणेच्या सुमारास झाला. या अपघात पिरमलसिंग धोंडीसिग परदेशी (वय ५५) व दत्तात्रय भानूदास शेळके (वय ५५ रा. कोरेगाव ता. कर्जत) हे दोघे जण जागेवरच ठार झाले. या पीकअप जिप चा चालक नितीन धुळाजी बदंगे (वय ३६ रा. बदंगवाडी ता कर्जत) हा गंभीर जखमी झाला होता. त्यास तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
परंतु उपचारादरम्यान पहाटे त्याचाही मृत्यू झाला. या घटनेचा तपास मोहोळ पोलिस करत आहेत.