सोलापूर : सोलापुरातील बुधवार बाजार परिसरातील एका अपार्टमेंट मध्ये व्यवसायाने फार्मासिस्ट असलेल्या युवकाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जुनेद सलीम शेख (वय २८ रा. बुधवार – बाजार, सोलापूर) असे या युवकाचे नाव आहे. दि. १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. Solapur. A young pharmacist committed suicide by jumping from the second floor
वर्षभरापूर्वीच एका डेंटिस्ट डॉक्टर तरुणीसोबत त्यांचा विवाह झाला होता. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून जुनेद शेख डिप्रेशनमध्ये होते. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
जुनेद शेख गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मानसिक तणावात होते. एका कंपनीत फार्मासिस्ट म्हणून नोकरी करत होते. नोकरीवर असताना त्यांचे डेंटिस्ट डॉक्टर तरुणीसोबत विवाह झाला होता. त्यांची पत्नी सुध्दा मदर तेरेसा रुग्णालयात कामावर होत्या. काही कारणास्तव त्यांनी मल्टीनॅशनल कंपनीमधील नोकरी सोडून एका छोट्या कंपनीत नोकरी स्वीकारली होती. तसेच एका मेडिकल शॉपचे कामकाज देखील पाहत होते. बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांनी बुधवार बाजार येथील राहत्या घरी अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. उडी मारल्या नंतर सरळ डोक्यावर खाली पडल्यामुळे गंभीर जखमा झाल्या होत्या.
काही वेळानंतर कुटुंबीयांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या सहकार्यातून जवळच असलेल्या मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात झाली असून, घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार मस्के हे करीत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ जेवण वाढण्याच्या कारणावरून दोन गटात सत्तुरने मारहाण; चौघे जखमी
सोलापूर – घराजवळ धार्मिक कार्यक्रमात जेवण वाढण्याच्या कारणावरून दोन गटात सुत्तुर, काठी आणि दगडाने केलेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास होटगी (ता.दक्षिण) सोलापूर येथे घडली.सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भीमा प्रल्हाद काळे (वय ३०) आणि त्याचा भाऊ नागनाथ काळे (वय ३२ रा. होटगी) अशी पहिल्या गटातील जखमीचे नावे आहेत. त्यांना शंकर काळे, अजय काळे आणि गोविंद काळे आणि या तिघांनी सत्तुर आणि दगडाने मारहाण केली. तर दुसऱ्या गटात गोविंद शंकर काळे (वय २६) आणि त्याचे वडील शंकर दौलत काळे (वय ५४) हे दोघे जखमी झाले. त्यांना भीमा प्रल्हाद काळे आणि अन्य दोघांनी सत्तुर आणि काठीने मारहाण केली अशी. प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
□ कारंबा येथे कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण पती-पत्नी जखमी
कारंबा (ता.उत्तर सोलापूर) येथे शेतातील रस्त्यावरून जायचे नाही. या कारणावरून कुऱ्हाडीचा तुंबा आणि लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत रामचंद्र गोविंद साळुंखे (वय ६२) आणि त्यांची पत्नी सुरेखा (वय ५० दोघे रा.संतोषनगर बाळे) हे जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते दोघे आज दुपारी कारंबा येथील आपल्या शेतात कांदे भरण्याचे काम करीत होते. त्यावेळी मारुती अदाटे, भीमराव अदाटे आणि इतर तिघांनी मारहाण केली, अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .