मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग तेरा ट्विट केले आहेत. राहुल गांधींनी काल सावरकरांवर आक्षेपार्ह विधान केले होते. यातून त्यांनी गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यात त्यांनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, पी. व्ही. नरसिम्हा राव, बाळासाहेब देसाई, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन या नेत्यांचा दाखला दिला आहे. ज्यात त्यांनी सावरकरांविषयी गौरवोद्गार काढले आहेत. Reply to Rahul Gandhi, Devendra Fadnavis’s 13 consecutive tweets BJP Congress Bharat Jodo Yatra
राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील याचा धक्का बसलाय. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे. तर मनसे राहुल गांधींना काळे झेंडे दाखवत आंदोलन करत आहेत.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, कोणीही कायदा हातात घेण्याचं काम करु नये. राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत सावरकरांविषयी बोलायची गरज नव्हती. मात्र त्यांनी बोलून वाद निर्माण केला आहे. तर दुसरीकडे याचा निषेध करताना संजय राऊत फक्त बोलतात, पण सत्तेसाठी राहुल गांधींना सोडत नाहीत, काँग्रेस सोडत नाहीत राहुल गांधींना चिकटून बसल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना लगावला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
भारत जोडो यात्रेतील एका सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सावरकरांनी स्वत:वर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते, हे त्या पुस्तकातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. ब्रिटिशांसाठी आणि काँग्रेसच्या विरोधात सावरकरांनी काम केलं. ब्रिटिशासमोर झुकले, मात्र इंग्रजासमोर बिरसा मुंडा झुकले नाहीत, ते आपल्या तत्वांवर ठाम होते. असं राहुल गांधींना म्हटल्यावर सध्या राज्यातील वातावरण तापले आहे.
फडणवीसांना ट्वीट करत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय. यात देवेंद्र फडणवीसांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत अनेक नेत्यांचा उल्लेख करत “अरे भाई आखिर कहना क्या चाहते हो?” असा प्रश्न विचारला.
राहुल जी,
कल आपने मुझे एक पत्र की अंतिम पंक्तियाँ पढ़ने को कहा था,
चलो, अब कुछ दस्तावेज़ आज मैं आपको पढ़ने देता हूँ।
हम सब के आदरणीय महात्मा गांधी जी का यह पत्र आपने पढ़ा ?
क्या वैसी ही अंतिम पंक्तियाँ इस में मौजुद है, जो आप मुझे पढ़वाना चाहते थे?#VeerSavarkar @RahulGandhi pic.twitter.com/hwtDtuB1ws— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 18, 2022
“भारताच्या माजी पंतप्रधान आणि तुमचा आजी इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काय म्हटलं होतं तेही वाचा. त्या वीर सावरकरांना स्वातंत्र्याच्या आंदोलनातील आधारस्तंभ आणि कायम लक्षात राहणारा भारताचा सुपुत्र म्हणत आहेत,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विटची मालिकाच प्रसिद्ध केलीय. राहुल गांधींना वीर सावरकर यांच्याबद्दल इंदिरा गांधी, शरद पवार यांच्यासह इतरांची काय मते होती हे दाखवून दिले आहे. तसेच महात्मा गांधी यांच्या पत्राचा मजकूर त्यांनीही वाचून दाखवावा असे सांगत त्यांचे एक पत्रच फडणवीस यांनी प्रसिद्ध केले आहे.
राहुल गांधी, काल तुमी मला एका पत्राच्या शेवटच्या ओळी वाचायला सांगितल्या होत्या. चला, आज मी तुम्हाला काही कागदपत्रे वाचून दाखवतो. आमच्या आदरणीय महात्मा गांधींचे हे पत्र तुम्ही वाचले आहे का?, त्यात त्याच शेवटच्या ओळी आहेत ज्या तुम्ही वाचायला हव्या होत्या? याचबरोबर शरद पवारांचे एक भाषण फडणवीस यांनी ट्विट केले आहे. तसेच इंदिरा गांधी यांचे एक पत्रही फडणवीस यांनी ट्विट केले आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव म्हणाले होते की, स्वातंत्र्यवीर सावरकर एक प्रखर राष्ट्रवादी होते. सामाजिक सुधारणांसाठी त्यांची कटिबद्धता, युवा पीढिला शिकवण देणारी त्यांची ऊर्जा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी लिहिलं आहे. वाचा,” असं म्हणत फडणवीसांना राहुल गांधींना वाचण्याचा सल्ला दिला.