Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सूरत – चेन्नई महामार्ग भूसंपादनाचे सर्व काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार

Surat-Chennai highway land acquisition work will be completed by the end of December

Surajya Digital by Surajya Digital
November 18, 2022
in Hot News, सोलापूर
0
सूरत – चेन्नई महामार्ग भूसंपादनाचे सर्व काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार
0
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

□ सूरत – चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार

□ भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

सोलापूर : सूरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यासाठी लवकरात लवकर भूसंपादन करावे, अशा सूचना महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या. Surat-Chennai highway land acquisition work will be completed by the end of December Solapur Guardian Minister Radhakrishna Vikhe-Patil

नियोजन भवन सोलापूर येथे सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग व शहरातील उड्डाणपूल संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, सूरत चेन्नई महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. शेत पिकांसाठी भूमिगत वाहिनी काढण्याबाबतचे अंतर कमी राहील, याची दक्षता घ्यावी. सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलांसंदर्भात शासकीय जागांबाबत तात्काळ मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 18 गावे, उत्तर सोलापुर तालुक्यातील 8 गावे, दक्षिण सोलापुरातील 16 गावे व अक्कलकोट तालुक्यातील 17 गावे अशी एकूण 59 गावातील भूसंपादन करण्यात येणार आहे. मोजणीसाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक अशी विविध विभागांची चार पथके तयार करून रोव्हरच्या साह्याने मोजणी करण्यात आली आहे. तसेच या पथकामार्फत जाग्यावरच शेतकऱ्यासमक्ष पंचनामे देखील करण्यात आले आहेत. सूरत- चेन्नई भूसंपादनाचे सर्व काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापूर शहरातील जुना पुना नाका ते पत्रकार भवन चौक व जुना बोरमणी नाका ते मोरारका बंगलापर्यंत दोन उड्डाणपूल होणार असून, हे दोन उड्डाणपूल 10.450 किमीचे होणार आहेत. या अंतर्गत येणाऱ्या 11 शासकीय विभागांच्या जागा तात्काळ मिळाव्यात, यासाठी शासनस्तरावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी सूरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्गावर करण्यात येणाऱ्या कामांची व देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी चिटणीस यांनी यावेळी दिली.

Tags: #Surat-Chennai #highway #land #acquisition #work #completed #end #December #Solapur #GuardianMinister #RadhakrishnaVikhe-Patil#सोलापूर #सूरत #चेन्नई #महामार्ग #भूसंपादन #काम #डिसेंबरअखेर #पूर्ण #पालकमंत्री #राजकारणविखे-पाटील
Previous Post

राहुल गांधींना उत्तर, देवेंद्र फडणवीसांचे सलग 13 ट्विट

Next Post

टिकेला उत्तर देण्यासाठीच बोललो, आमच्या चारित्र्यावर बोलू नका; राजन पाटलांचे उमेश पाटलांना ओपन चॅलेंज

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
टिकेला उत्तर देण्यासाठीच बोललो, आमच्या चारित्र्यावर बोलू नका; राजन पाटलांचे उमेश पाटलांना ओपन चॅलेंज

टिकेला उत्तर देण्यासाठीच बोललो, आमच्या चारित्र्यावर बोलू नका; राजन पाटलांचे उमेश पाटलांना ओपन चॅलेंज

वार्ता संग्रह

November 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697