● राजन पाटलांचे स्पष्टीकरण; वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी
• सोलापूर : मोहोळ – पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचा प्रचार टोकाला गेला होता. आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. आता निकाल लागला आहे. यात वादग्रस्त ठरलेल्या विधानावर माजी आमदार राजन पाटील यांनी आपले मत मांडले. तसेच त्यांनी नरखेडकर पाटलांना ओपन चॅलेंज देऊन टाकले. आता नरखेडकर पाटील ते स्वीकारणार का हे पहावे लागेल. Spoke only to answer the tic, not to speak of our character; Rajan Patal’s open challenge to Umesh Patal Narkhed Angar Mohol
नुकत्याच झालेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत विरोधकांनी माझ्या मुलांना ‘बाळा नावाने बोलून सभेतून सुख घेण्याची पाळी ओलांडली. ते सहन न झाल्यामुळेच केवळ त्यांच्या टिकेला उत्तर देण्यासाठीच मी बोललो. मात्र, याचा विपर्यास केला जात आहे. आम्ही लोकांचे संसार उध्वस्त न करता उभे करण्यासाठी आयुष्य वेचत आहोत, सहाजिकच आम्ही समाजकारणाला प्राधान्य देणारे पाटील आहोत. हे केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी तालुक्यातील जनतेला वेठीस धरणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. तरीपण, माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. असे सांगून आमच्या चारित्र्यावर कोणीही बोलून राजकीय भांडवल करू नये, असे आवाहन माजी आमदार राजन पाटील यांनी केले आहे.
विरोधकांकडून आमच्या चारित्र्याविषयीची अफवा पसरविली जात आहे. आम्ही काय आहोत? आणि आमचे चारित्र्य कसे आहे? हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे. यापूर्वी माझे थोरले सुपूत्र बाळराजे पाटील यांना विरोधकांनी खुनाच्या गुन्ह्यात गोवले होते. पण, न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. आमचा परिवाराला त्या प्रकरणात नाहक त्रास सहन करावा लागला. विरोधकांकडून सातत्याने आम्हाला बदनाम करण्याचे कटकारस्थान सुरु असते. पण, तालुक्यातील जनतेने अशा प्रवृत्तींना कधीही थारा दिला नाही. तालुक्यातील जनता आमच्यावर प्रेम करते. मागील दोन विधानसभा निवडणूकीत जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून नवख्या उमेदवारांना निवडून दिले आहे.
भीमा साखर कारखान्या निवडणुकीबाबत पाटील म्हणाले की, भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमच्याकडे लोक आले होते पण, एखादी जागा घ्या, असे सांगून आमचा अपमानच करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आमच्या कार्यकर्त्यांसाठी भीमाची निवडणूक लढणे गरजेचेच होते. आणि आम्ही ती लढलो. सभासद बांधवानी निवडणूकीत दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने मान्य केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार मतदार बोगसपध्दतीने वाढविले, आणि आमचे चार हजार सभासद कमी केले ती न्यायप्रविष्ठ बाब आहे. त्याबाबतचा निकाल निवडणूकीपूर्वी झाला असता तर आमची मते वाढली असती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राजन पाटील पत्रकार परिषदेसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
■ भीमाची निवडणूक आम्ही लादली नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भीमा कारखान्याच्या झालेल्या चर्चेमध्ये वाटाघाटीचा कोणताही विषय झाला नाही. धनंजय महाडिक यांनी आपल्याला व प्रशांत परिचारक यांना केवळ एक किंवा दोन जागा देऊ असे सांगितले. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही निवडणूक लादली, या बोलण्यात काहीही तथ्य नाही असे राजन पाटील म्हणाले.
■ आपण राष्ट्रवादीतच आहोत
आपण कुठेही जाणार नाही आपण राष्ट्रवादीमध्येच आहोत, कुठेही जाणार नाही. पक्षाचे नेते शरद पवार यांनी आपल्याला खूप काही दिले आहे. आज मीडियासमोर सांगतो शरद पवारांनी राजन पाटील यांच्या मर्जीविना तालुक्यात एकही उमेदवार त्यांनी दिलेला नाही, असेही राजन पाटील म्हणाले.
■ लोकनेते खासगी कारखाना नाही
लोकनेते हा खासगी कारखाना नाही. तो सभासदांचा कारखाना आहे. आजही त्याचे ९ हजार ५०० सभासद आहेत. विरोधक काहीही आरोप करतात, त्यात काही तथ्य नसल्याचे राजन पाटील म्हणाले.
》उमेश पाटलांना दिले ओपन चॅलेंज
– मोहोळ तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीला उभे राहावे
उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीला उभं राहावं. त्या ठिकाणी आपण ताकद बघू, ही ताकद वर्त्तृत्वात नसते, तर कर्तृत्वात असते. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी कुठल्यातरी निवडणुकीला उभं राहावं. त्यांच्या विरोधात मी माझ्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी देणार नाही, तर माझा सर्वसामान्य कार्यकर्ता लढेल, अशा शब्दांत मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजन पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांना आव्हान दिले.
राजन पाटील म्हणाले की, उमेश पाटील यांना मी मोहोळ तालुक्याची ओळख करून दिली आहे, त्यांना तालुक्यातील एकही कार्यकर्ता ओळखत नव्हता. पण, मनोहरभाऊ डोंगरेंसारखे पक्षाचे चांगले कार्यकर्ते माझ्यापासून दूर गेले होते, त्यावेळी माझी मानसिकता थोडी खचली होती. आपला आमदार निवडून आणू की नाही, असे वाटते होते, त्यामुळे बेरजेचे राजकारण करण्यासाठी मी उमेश पाटील यांना नरखेडमधून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती. ते आमच्यावर टीका करत आहेत याबद्दल वरिष्ठांकडे आम्ही बोललो आहे. वरिष्ठ त्याची निश्चित दखल घेतील, असेही पाटील म्हणाले.