■ तब्बल दोन महिन्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कारागृहात कैद्याकडे दोन मोबाईल सापडले आहेत. या प्रकरणी कैदी दिलीप जगलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बराक क्रमांक 1 समोरील शौचालयात जगले मोबाईलचा वापर करताना आढळून आला. एकाच दिवशी त्याला दोन वेळा मोबाईलचा वापर करताना पकडण्यात आले. कारागृहात जगलेकडे मोबाईल कसा आला याचा तपास झाला नाही. कारागृह कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 mobile phones of accused Barshi Mokka found in prison in Solapur
सोलापूर जिल्हा कारागृहाच्या बॅरेक क्रमांक एकच्या बाहेरील शौचालयातील दाराच्या बाजूस लाकडी चौकटीवरील भिंतीत एक मोबाईल व कारागृहातील हॉस्पिटल विभागाच्या वापरात नसलेल्या शौचालयात काळ्या चिकटपट्टीमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत एक मोबाईल असे दोन मोबाईल आढळून आले. ही घटना दि. २२ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. त्यानंतर कैदी दिलीप तायप्पा जगले याच्याविरुद्ध न्यायालयाच्या परवानगीनुसार तब्बल दोन महिन्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई हरिश्चंद्र महादेव राऊत (नेमणूक जिल्हा कारागृह सोलापूर) यांनी गुरुवारी रात्री हा गुन्हा दाखल केला आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये दक्षता पथक विभागाने सोलापूर जिल्हा कारागृहात भेट दिली. त्यानंतर या भेटीदरम्यान बरेक क्र. एकच्या शौचालयात दाराच्या वरील बाजूस सिमेंटचे कच्चे काम आढळले होते. पाहणी केल्यानंतर तेथे एक मोबाईल तसेच एक बॅटरी असे साहित्य सापडले.
दरम्यान कारागृहाच्या हॉस्पिटल विभागामध्ये वापरत नसलेल्या शौचालयात देखील काळ्या रंगाचा चिकटपट्टीमध्ये गुंडाळलेला मोबाईल, चार्जर असे एकूण दोन मोबाईल बॅटरी चार्जर पोलिसांनी जप्त केले आहे.
या आरोपीने इतर कैद्यांनी मोबाईल वापरल्याचा संशय आहे. असे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा अधिक तपास पोसई मोतेकर हे करीत असून, या प्रकरणात पोलीस प्रशासनाला चौकशी करिता कारागृहात जावे लागते. परंतु नियमानुसार कोणतीही व्यक्ती कारागृहात जाऊ शकत नाही. त्यामुळे या घटनेचा अधिक तपास करण्याकरिता तपास अधिकारी व पथकाला विशेष अधिकार द्यावे लागणार आहेत, असे सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ मोक्कांतर्गत कारवाईतील आरोपी बार्शीचा
मोक्कांतर्गत आरोपी हा मूळचा बार्शीचा असून, एका प्रकरणात त्याला शिक्षा झाल्याने तो इतर तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचे कळते. तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वीची ही घटना असून, कोर्टाच्या आदेशाने त्याची संपूर्ण तपासणी व चौकशी केल्यानंतर पुढील तपासासाठी घटनेची तक्रार जेलरोड पोलीस ठाण्यात केली आहे. मिळून आलेले मोबाईल जप्त केले असून, त्यात असलेले सिम कार्ड कोणाच्या नावाने आहे, त्याद्वारे कोणाशी संपर्क साधला आहे, तसेच कॉल रेकॉर्ड देखील तपासले जाणार आहे. या मोबाईलचा वापर कोणी कोणी केला. हे उघड होणार आहे.
• हरिभाऊ मिंड,
कारागृह अधीक्षक, सोलापूर
■ कारागृहात कसे आले मोबाईल ?
सोलापूर जिल्हा कारागृहात सापडलेले मोबाईल कसे आत आले असतील याबाबत चौकशी सुरू असून, मात्र हे मोबाईल अतिशय चालाकिने कारागृहात आणले आहे. तसेच बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानातून देखील कोणीतरी मोबाईल फेकले असेल व जाताना त्यांनी तो मोबाईल ठेवून निघून गेला असेल. यामागे कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा हा हेतू असू शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.