कोलकाता : दिल्लीत झालेल्या हत्याकांडाची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. येथे एका तरुणाने आईच्या सांगण्यावरुन वडिलांची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने करवतीच्या सहाय्याने मृतदेहाचे 6 तुकडे केले. आई व मुलाने उज्ज्वल चक्रवर्ती यांची हत्या केली. त्यानंतर दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने प्रेरित होऊन त्यांचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांना अटक केली आहे. Country shook, Shraddha Walker massacre repeated in Kolkata West Bengal
ही हृदयद्रावक घटना कोलकात्यातील बरुईपूर भागात घडली आहे. आई आणि मुलगा या दोघांनी उज्ज्वल चक्रवर्ती या व्यक्तीची हत्या केली आणि नंतर दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने प्रेरित होऊन त्यांचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. खरे तर खुनाच्या तीन-चार तासांनंतरही आई – मुलाला काय करावे हे समजत नसताना दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणासारखेच काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मुलाने वडिलांचे सहा तुकडे केले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मुलगा हत्या करून एवढ्यावर न थांबता करवतीच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेह लपवण्यासाठी त्याने वडिलांच्या मृतदेहाचे 6 तुकडे केले. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा मर्डर केसपासून प्रेरित होऊन आई आणि मुलाने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुलाने बाथरुमच्या आत करवतीने वडिलांचा मृतदेह कापला. ज्यामध्ये आईनेही त्याला साथ दिली. आई आणि मुलगा आधी मृतदेहाचे तुकडे सायकलवर एकत्र फेकण्यासाठी गेले. मात्र, त्यानंतर दोन वेळा मुलगा एकटाच मृतदेहाचे केलेले तुकडे सायकलवर टाकून फेकून देण्यासाठी गेला होता.
□ ‘मला बेडवरुनही…’, श्रद्धाचे WhatsApp चॅट आले समोर
श्रध्दा वालकर हत्या प्रकरणात लवकरच आरोपी आफताबची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आता श्रध्दाचे व्हॉट्सअप चॅट आणि इन्स्टाग्रामवरील मेसेजमध्ये केलेल्या खुलाश्याचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत. “मी आज येऊ शकतं नाही. कारण काल मला झालेल्या मारहाणीमुळे माझा रक्तदाब कमी झाला आहे आणि मला फार वेदना होत आहेत. बेडवरुन उठण्याची शक्ती माझ्यात नाही “, असे तिने एका मॅनेजरला मेसेजमध्ये म्हटले होते.
विशेष म्हणजे श्रद्धा हत्याकांडाचा तपास पाच राज्यांत सुरु आहे. पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातून पुरावे गोळा करुन सर्व माहिती मिळवली. घटनेचे सत्य बाहेर आणण्यासाठी सोमवारी आरोपी आफताबची नार्को टेस्टही केली जाऊ शकते. न्यायालयाने यापूर्वीच नार्को चाचणीला परवानगी दिली आहे. श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.
श्रध्दा वालकर हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. त्यानंतर आता दिग्दर्शक मनीष एफ सिंग यांनी या घटनेवर चित्रपट बनवणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘व्हू किल्ड श्रध्दा वॉकर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. तर चित्रपटाच्या कथेवर काम सुरू केल्याचे सिंग यांनी सांगितले. तसचे हा चित्रपट पूर्पणणे श्रध्दाच्या हत्या प्रकरणावर आधारीत नसून त्यातून प्रेरित असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.