बार्शी : निलेश उबाळे
बार्शी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले आहे, त्यापैकी १३ ग्रामपंचायती ह्या वैराग भागातील आहेत. बार्शी तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू वैराग भागाला समजले जाते तर वैराग भागाचा राजकीय केंद्रबिंदू जोतीबाच्यावाडीला (जवळगाव) समजले जाते. त्याची कारणेही अशीच काहीशी आहेत.. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार यावर वैराग भागासह तालुक्याचे लक्ष असते. Barshi. This is the colorful training of ZP; A third entry in the politics of cotton and diesel is jawalgaon
जवळगाव ग्रामपंचायतीची स्थापना १९५२ साली करण्यात आली. स्थापनेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दत्तात्रय केरबा कापसे हे सरपंच झाले. तिथून पुढे दहा वर्ष ते सरपंच होते. त्यानंतर १९६२ ते १९६७ या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कृष्णात निवृत्ती ढेंगळे हे सरपंच झाले. त्यानंतर १९६७ ते १९७२ या काळामध्ये उद्धव दत्तू कापसे हे सरपंच राहिले १९७२ ते १९७८ या काळामध्ये पुन्हा कृष्णात निवृत्ती ढेंगळे हे सरपंच होते तर १९७८ ते ८९ यावेळी त्र्यंबक देविदास कापसे हे सरपंच होते. ते वयाच्या २६ व्या वर्षी सरपंच झाले. त्यानंतर या जवळगावमध्ये टर्निंग पॉईंट ठरला, तो मध्यम प्रकल्प, भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी जवळगाव वसले होते त्याच ठिकाणी जवळगाव मध्यम प्रकल्प निर्माण करण्यात आला. त्यामुळे या जवळगावचे दोन भाग झाले. जोतिबाचीवाडी आणि अंबाबाईचीवाडी. त्यानंतर १९८९ ते १९९२ या तीन वर्षात प्रशासक राजवट होती.
प्रशासक कार्यकाळ पूर्ण होताच जोतिबाचीवाडी आणि अंबाबाईचीवाडी अशी वेगवेगळी निवडणूक झाली. जोतिबाचीवाडी १९९२ ते १९९७ या काळात अरुण कापसे हे सरपंच राहिले. त्यानंतर १९९७ पासून आज तागायत २०२२ पर्यंत सभापती अनिल डिसले यांच्या हातात सत्ता आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
२००७ ते २०१२ या काळामध्ये पारंपारिक विरोधक असलेले अरुण कापसे आणि अनिल डिसले यांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायत लढवली होती. यावेळी त्यांना यश देखील मिळाले यातून अनिल डिसले यांचे बंधू तुकाराम डिसले सरपंच झाले तर अरुण कापसे यांचे पुतणे विकास कापसे उपसरपंच म्हणून कार्यरत होते. त्यामुळे जवळगाव मध्ये सत्तेची समीकरणे कधी कशी फिरतील हे सांगणे कठीण आहे. जोतिबाचीवाडी हे गाव जवळगाव मध्यम प्रकल्पामुळे सदन बनले आहे. गावातील प्रत्येक ग्रामस्थ स्वयंपूर्ण आहे.
पारंपारिक विरोधक असणाऱ्या अनिल डिसले आणि अरुण कापसे या दोन्ही गटांना राष्ट्रवादीचे नागेश चव्हाण यांच्या रूपाने नव्या तिसऱ्या गटाकडून आव्हान देण्याची तयारी सुरू आहे. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत अनिल डिसले आणि अरुण कापसे यांच्या लढती ह्या तुल्यबळ राहिल्या आहेत. आता नागेश चव्हाण यांच्या रूपाने तिसरी शक्ती या लढतीमध्ये उतरत असल्यामुळे याचा फटका नेमका कोणाला बसणार आणि फायदा कोण उचलणार की दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होणार हे सर्व काही सुज्ञ मतदारांवर अवलंबून आहे.
यापूर्वी नागेश चव्हाण यांनी गतवेळी मनसेमधून बार्शी विधानसभेची निवडणूक लढवली आहे तसेच ते छावा या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आहेत. तरुणांची चांगली फळी त्यांनी उभा केली असून सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. या गावाने जिल्हा परिषदेला सदस्य, पंचायत समितीला सभापती, राज्य लेबर फेडरेशनला अध्यक्ष, राज्य माथाडी उपाध्यक्ष दिले आहेत तर राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये उच्च पदावर कार्यरत असणारे महान व्यक्तिमत्व देखील या गावामध्ये आहेत. याशिवाय शास्त्रज्ञ आणि संरक्षण खात्यामधील ग्रामस्थ आणि गाव सोडून बाहेर गेलेले यशस्वी व्यावसायिक हे या गावाची शान वाढवत आहेत. त्याचबरोबर अरुण कापसे त्यांचा माध्यमातून राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारे पदही गावात आले आहे.
● गणित बिघडवणार कि घट्ट होणार ?
एकूणच जवळगावामध्ये अनेक मातब्बर व्यक्ती असल्या तरी आजपर्यंतचे राजकारण मात्र डिसले आणि कापसे यांच्यामध्येच सुरू असल्याचे दिसले. मात्र आता यामध्ये चव्हाण, यांची एन्ट्री झाल्यामुळे यांचे गणित बिघडणार की आणखीन घट्ट होणार हे येणाऱ्या काळातच कळणार आहे …..