□ ‘प्रबोधनकार डॉट कॉम’चे झाले लोकार्पण
मुंबई : वंचित बहुजन आघाडी येत्या काळात ठाकरे गटाशी युती करेल याबाबत प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले आहे. निवडणूक कधी होते त्यावर आम्ही ठरवू, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या स्टे ऑर्डरवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार चालले असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जे कोणी गुलामगिरीला झुगारुन स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी काम करतील, त्यांच्यासोबत आम्ही जायला तयार असल्याचे ठाकरेंनी एका कार्यक्रमात म्हटले. Uddhav Thackeray gave a statement; Prabodhankar.com launch of Ambedkar’s suggestive statement on alliance with Thackeray group
दिवंगत प्रबोधनकार ठाकरेंचा रविवारी स्मृतिदिन. त्या निमित्ताने दादरच्या शिवाजी मंदिरात ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले आहे. शिवाजी नाट्य मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, संकेतस्थळाचे संपादक सचिन परब यांच्यासह शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पहिल्यांदाच एका मंचावर उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आले होते. दरम्यान, येत्या काळात शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विविध विषयांवर भाष्य केले. वैदिक धर्म म्हणजे विधवांचं मुंडण करणारा तर संत परंपरा म्हणजे विधवांचे पुनर्विवाह करणारी, त्यामुळे लोकांनी काय निवडायचे ते ठरवावे. आजच्या काळात लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असं भांडण सुरु आहे, असे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण मनुच्या कायद्यात अडकून पडणार आहोत की नव्याने काही उभारणार आहोत हा प्रश्न आहे. धर्मातील कोणते तत्वज्ञान घेऊन पुढे जायचे, हे ठरवायचा हा काळ आहे.
देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आपल्याला एकत्र यावेच लागेल. केवळ लोकांना जागे करून उपयोग नाही. आपण एकत्र येऊन हे काम करणार नसू तर दोघांना आपल्या आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी साद घातली. यावर प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी दोनवेळा युतीसाठी साद घातली असताना रविवारी प्रथमच ठाकरे यांनी त्याला जाहीरपणे प्रतिसाद दिला.
》 सुप्रिया सुळे म्हणाल्या; नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान’
पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात मी लिहीत नाही. ते काही चांगल्या गोष्टी देखील करत आहेत. नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकारणात आपल्याला मराठी संस्कृती देखील जपायची आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्या पिंपरी येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या.
सुप्रिया सुळे यांनी आज पिंपरी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनात उपस्थित राहिले. तेव्हा त्या बोलत होत्या. हल्ली विरोधकांनी सरकारचं कौतुक करणं ही खरंतर दुर्मिळ बाब मानली जाते. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या कामांचं कौतुक केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत. असा उल्लेख खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.