मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय हिंदी मालिकेतील बबिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मुनमुन दत्ताचा जर्मनीत अपघात झाला आहे. याबाबत तिने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. यात तिच्या पायाला दुखापत झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी चंपक चाचाची भूमिका करणाऱ्या अमित भट्ट यांचाही अपघात झाला होता. दरम्यान, या अपघातामुळे जर्मनीचा दौरा मुनमुनला अर्धवट सोडावा लागला आहे. Accident of ‘Taarak Mehta’ fame actress Munmun Dutta Babita Shraddha Walker movie
मुनमुन दत्ताने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली होती. त्यानंतर 2004 मध्ये तिने टेलिव्हिजनवरील हम सब बाराती मधून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. त्यानंकर ती ‘मुंबई एक्सप्रेस’, ‘हॉलिडे’ आणि ‘ढिंचॅक एंटरप्राइज’मध्ये देखील दिसली होती. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये देखील काम केले आहे.
अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच बबिताचा जर्मनीमध्ये अपघात झाला आहे. मुनमुन दत्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. मुनमुन दत्ताने 21 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या अपघाताबद्दल सांगताना तिने लिहिलंय की, एक छोटा अपघात जर्मनीमध्ये झाला आहे. माझ्या डाव्या गुडद्यावर जखम झाली आहे. मला माझी ट्रिप अर्धवट सोडून घरी परताव लागत आहे.
मुनमुन दत्ता जर्मनी ट्रिप आधी स्विझरलँडमध्ये देखील गेली होती. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी ती जर्मनीला गेली होती. स्विझरलँडमधील अनेक सुंदर फोटो मुनमुनने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोमध्ये मुनमुन खूप आनंदी दिसत आहे. परंतु आता झालेल्या अपघातामुळे तिला भारतात पुन्हा परतावं लागत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 श्रध्दा वालकर हत्येवर येणार चित्रपट; जंगलांमधून केलं जातंय व्हिडीओ क्लिप शूट, नावही ठरले
मुंबई : श्रध्दा वालकर हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. त्यानंतर आता दिग्दर्शक मनीष एफ सिंग यांनी या घटनेवर चित्रपट बनवणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘हू किल्ड श्रद्धा वालकर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. तर चित्रपटाच्या कथेवर काम सुरू केल्याचे सिंग यांनी सांगितले. तसचे हा चित्रपट पूर्पणणे श्रध्दाच्या हत्या प्रकरणावर आधारीत नसून त्यातून प्रेरित असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्रद्धा वालकर आणि तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाला यांच्यातील प्रेमकथा आणि त्याचा अत्यंत हिंसक पद्धतीने झालेला शेवट मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटाची तयारी सुरु असल्याचं सिंह यांनी जारी केलेल्या एका पत्रकार म्हटलं आहे. सिंह यांनी सध्या त्यांच्या अन्य एका प्रोजेक्टचं काम हाती घेतलं आहे. ‘लाइव्ह इन बॉयफ्रेण्ड’ च्या स्क्रीप्टचं काम सुरु झालं आहे. हा चित्रपटाचं कनाथक ‘लव्ह-जिहाद’च्या संकल्पनेवर आधारित असेल असं सांगण्यात आलं आहे. साध्या मुलींना कशाप्रकारे फसवलं जात आणि जाळ्यात ओढलं जातं याबद्दलची ही कथा असेल. वृंदावन फिल्मसच्या बॅनरखाली सिंह या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
श्रद्धा आणि आफताबच्या प्रेमप्रकरणावर आधारित चित्रपटाचं प्राथमिक नावही निश्चित झालं आहे. ‘हू किल्ड श्रद्धा वालकर’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. या चित्रपटाच्या कथेसंदर्भातील माहिती गोळा करण्याचं काम सुरु झालं आहे. सिंह यांच्या टीमकडून दिल्लीच्या आजूबाजूच्या जंगलांमधून व्हिडीओ क्लिप शूट केल्या जात आहे. या चित्रपटाचं शुटींग कुठे कारायचं यासंदर्भातील लोकेशन शोधम्याचं कामही सुरु आहे. या प्रकरणामध्ये दिल्ली पोलीस आरोपपत्र दाखल करत नाही तोपर्यंत चित्रपटाची पटकथा निश्चित केली जाणार नाही असंही निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे.
वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिल्याची घटना आठवडाभरापूर्वी समोर आली. हा गुन्हा सहा महिन्यांनंतर उघडकीस आला आहे.
श्रद्धाने प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित तरुणीच्या शरीराचे काही तुकडे दिल्ली पोलिसांना सापडल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत असतानाच दिग्दर्शक आणि निर्माते मनिष सिंह यांनी एक पत्रक जारी करत या कथानकावर आधारित चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार श्रद्धा वालकर आणि आफताबच्या प्रेमप्रकरणावरील या चित्रपटाच्या स्क्रीन प्लेचं काम सुरु झालं आहे. यापूर्वीही अशाप्रकारे वैवाहिक जीवनावर आधारित पण पत्नी-पत्नीमधील बिघडलेल्या संबंधांच्या आजूबाजूचे कथानक असणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘डार्लिंग्स’ चित्रपट चांगलाच चर्चेत होता. ‘बदरु’ ही भूमिका आलियाने साकारली होती. तर विजय वर्माने हमजा ही भूमिका साकारलेली. घरात पत्नीविरोधात होणारी हिंसा हा या चित्रपटाचा गाभा होता. या चित्रपटामध्ये शैफाली शाह यांनीही आलियाची आई शामसूची भूमिका साकारली होती. पत्नीबरोबरच्या या त्रासदायक नात्यातून बदरु आणि तिची आई कसे बाहेर पडतात याबद्दलची ही रंकज गोष्ट होती.
श्रध्दा वालकर हत्या प्रकरणात लवकरच आरोपी आफताबची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आता श्रध्दाचे व्हॉट्सअप चॅट आणि इन्स्टाग्रामवरील मेसेजमध्ये केलेल्या खुलाश्याचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत. “मी आज येऊ शकतं नाही. कारण काल मला झालेल्या मारहाणीमुळे माझा रक्तदाब कमी झाला आहे आणि मला फार वेदना होत आहेत. बेडवरुन उठण्याची शक्ती माझ्यात नाही “, असे तिने एका मॅनेजरला मेसेजमध्ये म्हटले होते.
विशेष म्हणजे श्रद्धा हत्याकांडाचा तपास पाच राज्यांत सुरु आहे. पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातून पुरावे गोळा करुन सर्व माहिती मिळवली. घटनेचे सत्य बाहेर आणण्यासाठी सोमवारी आरोपी आफताबची नार्को टेस्टही केली जाऊ शकते. न्यायालयाने यापूर्वीच नार्को चाचणीला परवानगी दिली आहे. श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.