सोलापूर – महाराष्ट्रात विक्री परवान्यास मान्यता नसलेली उत्पादने शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने सोलापुरातील तीन कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. या कारवाईने कृषि केंद्र चालकात खळबळ उडाली आहे. Solapur Agriculture Department strikes Seva Kendras; Licenses of three agricultural centers suspended
महाराष्ट्रात विक्री परवाना नसलेल्या ‘मॉडर्न ऍग्री जेनेटिक लिमिटेड’ कंपनीचे कीटकनाशके विक्री करणाऱ्या व तपासणीत अनेक त्रुटी आढळलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३ कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्याची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केली. मागील दोन दिवसापूर्वी मॉडर्न ऍग्री जेनेटिक लिमिटेड कंपनीसह करकंब येथील ओंकार कृषी केंद्र चालकावर गुन्हा ही दाखल केल्यानंतर “मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील विठ्ठल कृषि केंद्र , महावीर ट्रेडिंग कंपनी माळशिरस ता. माळशिरस, कलाशंकर कृषि केंद्र नातेपुते ता. माळशिरस ” यांचे परवाने निलंबित करण्यात आले.
यासर्व कृषी केंद्रात महाराष्ट्रात विक्री परवाना नसलेल्या मॉडर्न ऍग्री जेनेटिक लिमिटेड कंपनीचे कीटकनाशके तपासणीत मिळून आल्याने या तीन कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले.
पंढरपूर तालुक्यातील करकंब व बार्डी या गावातील २० द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी ऑक्टोबर बाग छाटणी अगोदर 10 ते 15 दिवस ओंकार कृषी केंद्र करकंब येथून ग्लायस्टाप ४१ टक्के SL हे तणनाशक फवारणी केली होती. छाटणीनंतर बाग फुटलीच नाही. त्यामुळे मोठे नुकसान झाले.त्यानंतर कृषी विभाग अँक्शन मोडवर आला असून या पुढे भरारी पथकामार्फत दुकाने तपासणीची कारवाई सुरुच ठेवण्यात येणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आवश्यक असलेली काही कृषी केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडताना नेहमीच दिसतात. जादा हव्यासापोटी बोगस खते, बियाणे, औषधे विकून पैसा मिळवण्याच्या मोहात अनेक शेतकरी अडचणीत येतात आणि त्यांचे प्रचंड नुकसान होते. अनेक कृषी केंद्रे शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेली असताना काही केंद्रावर असे गैरप्रकार होताना दिसतात.
कृषी विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होते परंतु तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असते. नुकतेच पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एका कृषी केंद्रावर गुन्हा दाखल कारवाई करण्यात आली आहे आणि आता सोलापूर जिल्ह्यातील तीन कृषी केंद्राचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहेत.
● या कारणासाठी परवाने निलंबित
कृषी केंद्रात ग्राहकास दिसेल अशा पद्धतीने दर्शनी भागात भाव फलक लावलेला नाही, किटकनाशकाचा साठा किती आहे हे नमूद करण्यात आले नाही, शेतकऱ्यांना दिलेल्या बिलावर औषध कंपनीचे नाव, पॅकिंग प्रकार, बॅच, उत्पादनाची तारीख, मुदत व किंमत नमूद केले नाही. विक्री परवान्यास मान्यता नसलेली उत्पादने विक्रीस ठेवणे असे प्रकार दुकान तपासणीत आढळून आले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तीन कृषी केंद्राचे परवाने पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत.
● कारवाई अधिक तीव्र करणार
मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील विठ्ठल कृषी केंद्र, माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील कलाशंकर कृषी केंद्र आणि महाविर ट्रेडिंग कंपनी माळशिरस या दुकानात मॉडर्न ऍग्रीजेनेटिक्स या किटकनाशक पुरवठा करणाऱ्या पुरवठाधारकाचे प्रमाणपत्र मंजूर नसताना विक्री करीत असल्याने कारवाई करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी दुकानदाराकडून पावती घ्यावी. किटकनाशक अथवा अन्य औषधाविषयी तक्रारी असतील तर आमच्या विभागाशी संपर्क करावा. यापुढे ही कारवाई सुरूच राहणार आहे.
बाळासाहेब शिंदे
– जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर