सोलापूर : 26/11 च्या हल्ल्यात बलिदान देणाऱ्या पोलिसाच्या नावावरून गावाला नाव देण्यात आले आहे. 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी तातडीने एसआरपीएफ कॉन्स्टेबल राहुल शिंदे ताज हॉटेलमध्ये पोहोचले, तेव्हा दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते शहीद झाले. Solapur. 26/11 Day : As a symbol of sacrifice, the name of the village was changed to Madha Sultanpur Rahul Nagar त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून गावकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील ‘सुलतानपूर’ गावाचे नाव ‘राहुल नगर’ ठेवण्याचा निर्णय घेतला असून अधिकृत घोषणा लवकरच होईल.
26/11 रोजी मुंबईत आठ ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. यात विदेशी लोकांसह 166 लोक मारले गेले. तर, 300 हून अधिक जखमी झाले. मुंबई पोलिस दलातील 14 अधिकारी व कर्मचार्यांनी हौतात्म्य पत्करले. यात नऊ दशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. पोलिस अधिकारी तुकाराम ओंबाळे यांनी कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठा पुरावा म्हणून मिळवून दिला होता. त्यांच्यामुळेच कसाबला शिक्षा होऊ शकली.
हजार लोकसंख्या आणि 600 घरे असलेल्या सुलतानपूर गावातील लोकांनी 2008 मध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानाच्या नावावरून गावाचे नावं बदलेले आहे. गावकऱ्यांनी गावाचे नावं ‘राहुल नगर’ असे बदलले आहे. राज्य राखीव पोलीस दलातील हवालदार राहुल शिंदे यांनी 14 वर्षांपूर्वी या दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त केली होती. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची बातमी मिळताच दक्षिण मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये प्रथम पोहोचलेल्या आणि प्रवेश करणाऱ्या पोलिसांमध्ये राहुल शिंदे यांचाही समावेश आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दहशतवाद्यांनी राहुल शिंदे यांच्या पोटात गोळी झाडली आणि त्यांचा मृत्यू झाला. राहुल शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सुलतानपूर गावचे रहिवासी होते. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल सरकारने त्यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केले. सुलतानपूरच्या रहिवाशांनी राहुल शिंदे यांच्या स्मरणार्थ गावाचे नावं बदलण्याचा निर्णय घेतला.
शिंदे कुटुंबाने 2010 मध्ये गावात राहुलच्या नावाने एक स्मारकही बांधले आहे. शहीद राहुल शिंदेचे वडील सुभाष विष्णू शिंदे यांनी 26/11 हल्ल्याच्या एक दिवस आधी सांगितले की, “गावाचे नाव बदलण्याची सर्व अधिकृत औपचारिकता पूर्ण झाली आहे. आता आम्ही अधिकृत नाव बदलण्याच्या कार्यक्रमाची वाट पाहत आहोत. आम्ही मान्यवरांकडून तारीख निश्चित होण्याची वाट पाहत आहोत आणि लवकरच ते निश्चित केले जाईल.
दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुंबईचे पोलिस उपायुक्त असलेले विश्वास नांगरे पाटील यांनी या प्रक्रियेत मला मदत केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आपल्या मुलाच्या बलिदानाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, दहशतवाद्यांशी लढताना त्याने धैर्य दाखवले आणि देशासाठी बलिदान दिले. ते म्हणाले, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे.
वीर पोलिसाचे वडील म्हणाले, “राहुलची आई अजूनही दुःखामध्ये आहे. ती अजूनही परिस्थितीनुसार स्वत:ला सावरू शकली नाही, राहुल आता या जगात नाही हे अजूनही तिला मान्य नाही. राहुल शहीद झाल्यानंतर सरकारने आम्हाला नियमानुसार आर्थिक मदत केली. आम्हाला मुंबईत फ्लॅट आणि तालुक्यात गॅस एजन्सीही मिळाली, ज्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
“मी गेली 10 वर्षे यावर काम करत आहे. अखेर ते घडले. मी आता समाधानी आहे आणि मला दुसरे काहीही नको आहे. हे गाव माझ्या मुलाच्या नावाने ओळखले जाईल याचा मला अभिमान वाटतो”
– सुभाष विष्णू शिंदे , शहिद पोलिसाचे वडील