□ रामदेवबाबांचे वादग्रस्त विधान; माझ्या नजरेने महिलांनी काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात
मुंबई : रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यावर महाराष्ट्र महिला आयोगाने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवून दोन दिवसांमध्ये वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, ‘ असे बाबा रामदेव म्हणाले होते. Women Commission notice to Baba Ramdev MP Shrikant Shinde Amrita Fadnavis
योगगुरु रामदेव बाबांनी वादग्रस्त विधान केले आहे. ठाणे येथे योग प्रशिक्षण झाल्यावर महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळ मिळाला नाही. यावर रामदेव बाबा मिश्किलपणे म्हणाले, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही. महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, असे ते म्हणाले.
योगगुरू रामदेवबाबा यांनी ठाण्यात महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ठाण्यात पतंजलीचं महिलांचं संमेलन पार पडले. देशभरातून रामदेव बाबांच्या त्या वक्तव्याचा कडाडून निषेध व्यक्त केला जात आहे.
साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे या सर्वांच्या उपस्थित केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा वाद अधिक चिघळला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
इसलिये महाराष्ट्र राज्य महिला आयोग की धारा 12 (2) और 12 (3) , 1993 के अनुसार आयोग बाबा रामदेव को उनके वक्तव्य का खुलासा दो दिनों के भीतर आयोग कार्यालय में प्रस्तुत करने का निर्देश देता है.(2/2) #Ramdevbaba @ChakankarSpeaks @AcharyaBalkrsna @NCWIndia
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) November 25, 2022
महिलांसाठी योगासनांचे ड्रेस आणण्यात आले आहे. पतंजली महिला संमेलनात अमृता फडणवीसही आल्या होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांचं त्यांनी कौतुक केलं. अमृता फडणवीस या कायम प्रसन्न असतात. लहान मुलांप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. असं हसू मला प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर पाहायचं आहे. यापुढे ते म्हणाले महिला साड्या नेसून चांगल्या दिसतात. त्या सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिलं तर काही नाही घातलं तरीही चांगल्या दिसतात असं रामदेवबाबांनी म्हटलं आहे.
रामदेवबाबांनी अमृता फडणवीस यांचं खूप कौतुक केलं. अमृता फडणवीस यांना तरूण राहण्याची इतकी हौस आहे की मला वाटतं की त्या १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत. त्या खूप प्रमाणात अन्न ग्रहण करतात आणि कायम खुश राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर कायमच लहान मुलाचं हसू असतं. असं म्हणत रामदेवबाबांनी अमृता फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
यासगळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी रामदेव बाबांवर कडाडून टीका केली आहे. रुपाली पाटील यांनी अमृता फडणवीस स्टेजवर असताना रामदेव बाबांनी महिलांच्यासंबंधी असे वक्तव्य करणे चूकीचे आहे. त्यांना ते शोभले नाही. यापूर्वी देखील त्यांनी सातत्यानं अपमानास्पद वक्तव्य केली आहेत. त्यामुळे बोलताना आपण काय बोलतो आहोत याचे भान ठेवणे त्यांनी गरजेचे आहे. असे सांगताना रुपाली पाटील यांनी रामदेवबाबांना शीर्षासन करण्याचा सल्ला दिला आहे. रामदेव बाबांना केलेले वक्तव्य बेताल असून, ४ तास शिरसासन करावे म्हणजे त्यांच्या मेंदूला रक्त पुरवठा होईल. मुळातच अमृता फडणवीस स्टेजवर असताना रामदेव बाबांनी अशाप्रकारे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी रामदेव बाबांच्या कानाखाली सणकन ठेवून द्यायला हवी होती. अशी तिखट प्रतिक्रिया पाटील ठोंबरे यांनी दिली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हटलं आहे की, “रामदेव बाबांना आई आहे . आणि ते ब्रम्हचारी… मग . मनात डोळ्यात विकृती.मराठी साहित्यात परस्त्री माते समान.”