● गोखले सगळे सोडून 7 वर्षे करत होते शेती
पुणे : अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी आता गोखले यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. Veteran actor Vikram Gokhale passes away, 18-day battle with death ends त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते कोमात गेले होते.
अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खूप चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. अनेक अवयव निकामी झाले आहेत. पण डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत. ते बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली जात आहे.
77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव बालगंधर्व नाट्यगृहात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील वैकुंट स्मशानभुमीत संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे..
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘गोदावरी’ हा त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट ठरला. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनेक मराठी चित्रपटात गोखले यांनी भूमिका साकारल्या होत्या. तसेच हिंदी चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपट क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. भावपूर्ण श्रद्धांजली !’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बॉलिवूडमधील अभिनेते अक्षय कुमार यांनीही त्यांना ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.. आपण त्यांच्याबरोबर भूलभुलैया, मिशन मंगल मध्ये काम केले असून त्यांच्याकडून खूप शिकण्यास मिळाल्याचे म्हटले.
Very sad to know of the demise of Vikram Gokhale ji. Worked with him in films like Bhool Bhulaiyaa, Mission Mangal, had so much to learn from him. Om Shanti 🙏 pic.twitter.com/WuA00a2bpO
— Akshay Kumar (@akshaykumar) November 26, 2022
आज संध्याकाळी 6 वाजता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. दमदार आवाजाचे ते अभिनेते होते. त्यांचे अनेक सिनेमातील संवाद गाजलेत. मराठी सिनेमा नटसम्राट, वजीर तसेच हिंदी मधील अग्नीपथ, खुदा गवाह, या सिनेमातील त्यांचे संवाद प्रचंड गाजले. चाहते आजही त्यांच्या संवादांना आवडीने दाद देतात.
विक्रम गोखले यांचे निधन झाल्याचे ट्विट अभिनेता अजय देवगनने मागे केले आहे. त्यावरुन अनेक माध्यमांनी बातम्याही दिल्या. यानंतर बऱ्याच वेळेनी विक्रम गोखले यांच्या मुलीने स्पष्टीकरण दिले होते की, ‘विक्रम गोखले यांची प्रकृती अजूनही अत्यंत गंभीर आहेत आणि लाइफ सपोर्टवर आहेत, त्यांचे निधन झालेले नाही’.
अनेक वर्षे रंगभूमीवर कलाकार म्हणून काम करणारे गोखले हे एक दिवस रंगभूमी आणि सर्व काही सोडून 7 वर्ष शेती करण्यासाठी गेले होते. स्वतः विक्रम गोखले यांनी मुलाखतकार प्रदीप भिडे यांच्या कोर्ट मार्शल या कार्यक्रमात याबद्दलचा किस्सा सांगितला होता. 1982 ते 1989 हा काळ खंड त्यांनी शेती करण्यासाठी घालवला होता.
विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा,’ अशी माहितीत्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. तसेच कृपया त्यांच्या निधनाबाबत अफवा पसरवू नये, असं आवाहन देखील गोखले यांच्या कुटुंबीयांनी केलं होते.
विक्रम गोखले यांच्या निधनाची अफवा चार दिवस झाले पसरली होती. मात्र त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते, अशी माहिती त्यांची पत्नी वृषाली यांनी दिली होती. तसेच गोखले सायंकाळी कोमामध्ये गेले. ते स्पर्शालाही प्रतिसाद देत नसून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे, यासंदर्भात सविस्तर माहिती डॉक्टरांकडून सकाळी दिली जाईल, असेही वृषाली यांनी सांगितले होते.
सध्या विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले होते. काही माध्यमांमधील वृत्त आणि बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर गोखले यांच्या प्रकृतीबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाली होती.
विक्रम गोखले यांना बालपणीच अभिनयाची गोडी लागली होती. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले म्हणजेच कमलाबाई कामत यादेखील अभिनेत्री होत्या. तसेच त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीदेखील अनेक सिनेमांत काम केलं आहे
विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी झाला. त्यांनी चित्रपट मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले आहे. गोखले यांना चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखलं जातं. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.
विक्रम गोखलेंना खरी ओळख ही ‘बॅरिस्टर’ नाटकामुळे मिळाली. जयवंत दळवींनी हे नाटक लिहिले होते. बॅरिस्टर या नाटकात विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी एकत्र काम केले होते. याशिवाय कथा, कमला, के दिल अभी भरा नही, छुपे रुस्तम अशा अनेक नाटकात त्यांनी काम केले होते. पण घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकामधून संन्यास घेतला होता.
विक्रम गोखलेंच्या आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची खासियत आहे. ‘या सुखानों या’, ‘एबी आणि सीडी’, ‘नटसम्राट’, ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘कळत नकळत’, ‘दुसरी गोष्ट’, ‘अनुमती’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘आघात’ अशा अनेक मराठी सिनेमांत विक्रम गोखलेंच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. तसेच ‘स्वर्ग नरक’, ‘इंसाफ’, ‘अग्निपथ’, ‘खुदा गवाह’, ‘अर्धम’ अशा हिंदी सिनेमांतदेखील त्यांनी काम केलं आहे. रंगभूमी, छोट्या-मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणारे विक्रम गोखले वेब-सीरिजपासूनदेखील मागे राहिलेले नाहीत. त्यांनी ‘उडान’, ‘क्षितिज ये संजीवनी’, ‘जीवन साथी’, ‘सिंहासन’, ‘मेरा नाम करेगी रोशन’ या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे. सध्या विक्रम गोखलेंचा ‘गोदावरी’ सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे.
● विक्रम गोखलेंना मिळालेले पुरस्कार
* ‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी 2013सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार.
* विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार- 2015
* ‘बलराज साहनी – साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार
* हरिभाऊ साने जीवनगौरव पुरस्कार- 2017
* पुलोत्सव सन्मान – 2018
* चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार