ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या स्वभावाचे विविध पैलू सांगता येतील. नाट्य व सिने क्षेत्राविषयीची विलक्षण आवड. जे सहन होत नाही, ते तिथेच स्पष्टपणे ते बोलायचे. त्यांच्या एका विधानाने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. Parakhad and rebel: A statement by Vikram Gokhale created a stir in the political arena Blog Solapur hutatma smruti mandhir
देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ पासूनच मिळाले. हे त्यांचे विधान भाजपच्या सत्तेची प्रशंसा करणारे होते, असा समज भाजप विरोधकांचा झाला आणि त्यांच्यावर टीका सुरू झाली. नानातऱ्हेचे आरोप झाले. तरीही ते डगमगले नाहीत. आपल्या विधानाशी ते ठाम राहिले. माफीनामा वगैरे त्यांच्या नेचरमध्ये बसतच नव्हते. देशात असलेली त्यांची लोकप्रियता पाहता उलट विरोधकांनी टीका व आरोपांमधून काढता पाय घेतला.
भारताला २०१४ पासूनच खरे स्वातंत्र्य मिळाले या मतावर मी ठाम असून ते मत बदलणार नाही, असे खडसावून सांगताच विरोधकांची बोलतीच बंद झाली. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल कंगना राणावत हिने केलेल्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात ते अडकले होते. पण त्यांनी आपली बाजू ठामपणे मांडली. २०१४ पासून देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले हे माझे प्रामाणिक मत आहे. मी त्यावर ठाम असून ते बदलणार नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मूळ भाषणात मी काय म्हणालो ते दाखवण्यात आलेले नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे गोखले सडेतोडपणे बोलले.
‘१९४७ साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती, खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं, असं वक्तव्य कंगनानं अलीकडंच एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून प्रचंड गदारोळ सुरू असतानाच विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. त्यामुळं गोखले यांच्यावरही टीकेची झोड उठली. त्यानंतर त्यांनी आज आपल्या भूमिकेचा खुलासा केला. “कंगनाची दोन वर्षांतली मतं तिची वैयक्तिक आहेत. स्वातंत्र्याबद्दल तिनं व्यक्त केलेल्या मताला तिची वैयक्तिक कारणं आहेत. तिचं समर्थन करताना माझी कारणं वैयक्तिक आहेत. मी तिला ओळखतही नाही. मी केवळ तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. तो माझ्या अभ्यासाच्या आधारे दिला.
१८ मे २०१४ च्या ‘गार्डियन’ मध्ये जे लिहिलं गेलंय, तेच कंगना बोलली होती. ती काही चुकीचं म्हणाली नाही एवढंच मी म्हणालो. मी त्या मतावर आजही ठाम आहे. २०१४ पासून जागतिक पटलावर सक्षम उभं राहायला सुरुवात झाली, असं गोखले म्हणाले. मी तोंडफाटका माणूस आहे. मला ओठ शिवता येत नाहीत. त्यामुळंच माझी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधीलकी नाही.
RIP Vikram Gokhle 💐
This scene from natsamrat, will always iconic.#VikramGokhale pic.twitter.com/uipntDmoTL— Ajay Ashok Sutar (@Ajay_S99) November 23, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://twitter.com/Akkians_Old/status/1595487099255259137?t=lYOSJxoJA9KCEoi_yNTlUA&s=19
गेल्या ३० वर्षांत मला अनेक राजकीय पक्षांचे निरोप आले, पण मी गेलो नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. कंगनाचे समर्थन करून मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असे म्हणणे चुकीचे आहे. माझ्या मूळ भाषणात मी काय बोललो हे दाखवले गेलेले नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असे कुणाला वाटत असेल तर ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल’ हे गीत म्हणताना, ज्यांची अवहेलना झाली त्यांचे काय? तेव्हा आपल्याला शरम वाटली नाही का?, असा सवालही गोखले यांनी टीकांना उत्तर देताना परखडपणे म्हणाले होते.
त्यांच्या परखडपणाचा अजून एक अनुभव सांगता येईल. सोलापूरशी त्यांचा मोठा ऋणानुबंध होता. सोन्नलगीत येऊन अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कसदार भूमिकेचे दर्शन सोलापूरकरांना घडवलले होते. हुतात्मा स्मृती मंदिर ही त्यांची आवडती रंगभूमी. सोलापुरात जी नाटके गाजतात, ती राज्यभरही फेमस होतात, असे ते नेहमी सांगायचे. हुतात्मा विषयी त्यांना इतकी आस्था होती. सोलापूरचे दिवंगत रंगकर्मी नामदेव वठारे यांच्या स्मृती निमित्त हुतात्मात नाट्य महोत्सव भरवला गेला होता. त्याची ‘घंटा’ गोखले यांच्या हस्ते वाजवली गेली होती.
कथा हे नाटक त्यांनी सादर केले होते. सादरीकरण झाल्यानंतर हुतात्मामधील काही दोष त्यांच्या निदर्शनास आल्या. मेकअप रूप, नेपथ्य व्यवस्था, साउंड सिस्टिम, खुर्च्या आदी सुविधांबाबत त्यांना चीड आली. लागलीच त्यांनी रंगमंचावरून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना फोन लावला. हुतात्माच्या दूरावस्थेची कहाणी त्यांना सांगितली. हुतात्माचे नूतनीकरण झाले तरच यापुढे मी नाटक करायला सोलापूरला येईन अन्यथा नाही, असे गोखले स्पष्टपणे बोलले.
त्याची दखल सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली व वाट्टेल तेथून निधी जमवून शिंदे यांनी तातडीने हुतात्माचे अद्ययावतीकरण करून घेतले. गोखले यांच्या वेदनेची ही किमया. गोखले यांच्या विषयीची ही आठवण सांगताना नामदेव वठारे यांचे सुपुत्र गुरू वठारे यांना गहिवरून आले होते. या नाट्य महोत्सवाला गोखले यांचे येणे म्हणजे माझ्या आयुष्याची ही मोठी शिदोरी आहे, अशा शब्दात गुरू वठारे यांनी गोखले यांना शब्दसुमनांजली अर्पण केली.
विक्रम गोखले यांच्या घराण्यात चार पिढ्यांमध्ये हे कलावंतपण मुरलेले होते. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटातील पहिल्या स्त्री कलावंत; तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बालकलाकार. वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील एक नावाजलेले अभिनेते. पण विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले. जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’ सारख्या सिनेमातली का असेना.
रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्या संदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी ठरले. म्हणूनच रंगभूमीवर ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवले नव्हते. दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला आहे. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे त्यांनी सक्रिय कार्य केले. त्यांच्या स्मृतीला सुराज्य परिवाराचे विनम्र अभिवादन.