Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर । लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात 40 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

Solapur. Subhash Deshmukh made silk knots tied by 40 couples at the Lokmangal wedding ceremony

Surajya Digital by Surajya Digital
November 27, 2022
in Hot News, सोलापूर
0
सोलापूर । लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात 40 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ हजारो व्हराडी मंडळींची उपस्थिती

सोलापूर : आज रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना…लगीन घाई सुरु… 40 जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली… या जोडप्यांना कुठलाच धर्म नव्हता, आयुष्यभर साथ देण्यासाठी… त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या. लोकमंगल फौंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात. याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. Solapur. Subhash Deshmukh made silk knots tied by 40 couples at the Lokmangal wedding ceremony

माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी (ता. 27 नोव्हेंबर) विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरुनगर (डी. एड. कॉलेजच्या) मैदानावर हजारो मान्यवरांच्या उपस्थिती विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 40 वधू-वरांनी रेशीमगाठी बांधल्या.

सकाळी सर्व वधू- वरांना आ. सुभाष देशमुख यांनी समुपदेशन केले. वधू- वरांना मान्यवरांच्या हस्ते शालू, सफारी व रुखवत साहित्य देण्यात आले. विवाह सोहळ्यामध्ये शासकीय योजनांची माहिती देणारे दालन उभारण्यात आले होते. रक्तदान शिबिरही घेण्यात आले. लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधूवरांच्या पालक तसेच नातेवाईकांना भोजन देण्यात आले. मसाले भात, पोळी भाजी, भजी आणि मोतीचूर लाडू असा मेनू होता.

 

गेल्या दोन वर्षी कोरोनाकाळामुळे वधू-वरांची मिरवणूक काढली नव्हती. यंदा कोरोना संपल्यामुळे वधू-वरांची रिक्षातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्याही या सोहळ्यात आ. सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनी प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केले. वधूंना मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे दिले.

सायंकाळी गोरस मुहूर्तावर सुरवातीला बौद्ध पद्धतीने विवाह लावण्यात आला. त्यानंतर हिंदू रितीप्रमाणे उर्वरित विवाह पार पडले. यावेळी खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, रेणुक शिवाचार्य महाराज, पंचाक्षरी महास्वामी, आ. सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, मनीष देशमुख, बसवराज शात्री, ह. भ. प. शिवपुत्र स्वामी महाराज, ह. भ. प. ज्योतिराव चांगभले महाराज, ह. भ. प. विष्णुपंत मोरे महाराज, ह. भ. प. रमेश महाराज शिवपूरकर, ह. भ. प. बळीराम जांभळे महाराज, ह. भ. प. संजय केसरे, महाराज, ह. भ. प. अभिमन्यू डोंगरे महाराज, नरेंद्र काळे , अमर बिराजदार , गणेश चिवटे, सोमनाथ केंगनाळकर, सभापती गुरुसिद्ध मेह्त्रे, डॉ. चनगोंडा हवीनाळे, शशी थोरात, महेश देवकर, श्रीनिवास करली , भाजपचे दक्षिण तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, सचिन चव्हाण, मनिषा हुचे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ यंदाच्या वर्षीच्या सोहळ्याची वैशिष्ट्ये

16 वर्षात विवाह झालेल्या 2 हजार पेक्षा जास्त जोडप्यांना विशेष निमंत्रण देऊन पाचारण करून त्यांना आहेर देण्यात आला. लोकमंगल समूहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दालनात लोकमंगल समूहाच्या आजवरच्या कार्याचे दर्शन घडविणारे प्रदर्शन भरवण्यात आले होते. व्यासपीठावर भव्य कासवाची प्रतिकृती यंदाच्या समारंभातील काही वधूंचे कन्यादान लोकमंगलच्या देणगीदारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मनकी बात हा कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. प्रेक्षकात बसून सुभाष देशमुख यांनीही कार्यक्रम पाहिला.

 

□ शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करू : आ. देशमुख

 

आपण या समाजात जन्मलो आहे. त्यामुळे समाजाचे ऋणी लागतो म्हणून लोकमंगल परिवार जनतेबरोबर आहे. लोकमंगलच्या या प्रयत्नाला सर्वांनी साथ द्यावी. सर्वांची साथ मिळाल्यास शेवटच्या माणसाचेही अश्रू पुसण्याचे काम आपण करू. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक होईल, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी विवाह सोहळ्याप्रसंगी केले.

Tags: #Solapur #SubhashDeshmukh #made #silk #knotstied #by40couples #Lokmangal #wedding #ceremony#सोलापूर #लोकमंगल #विवाह #सोहळा #40जोडपे #बांधल्या #रेशीमगाठी #सुभाषदेशमुख
Previous Post

परखड आणि बंडखोर : विक्रम गोखलेंच्या एका विधानाने राजकीय क्षेत्रात उडाली होती खळबळ

Next Post

विठ्ठल मंदिर दिसणार मुळ स्वरुपात; पाच टप्प्यात होणार काम, मुंबईत विशेष बैठक

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
विठ्ठल मंदिर दिसणार मुळ स्वरुपात; पाच टप्प्यात होणार काम, मुंबईत विशेष बैठक

विठ्ठल मंदिर दिसणार मुळ स्वरुपात; पाच टप्प्यात होणार काम, मुंबईत विशेष बैठक

वार्ता संग्रह

November 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697