मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श होते, असे विधान केल्यानंतर राज्यपालांना हटवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र बंदचा इशाराही विरोधकांनी दिला आहे. त्यानंतर कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांना परत जायचे आहे, असे वृत्त समोर आले आहेत. ते स्वतः राजीनामा देणार, अशी चर्चा आहे. Governor Bhagatsinh Koshyari’s wish to be relieved! As soon as the signal of Maharashtra bandh was given, there was a panic
‘राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली ! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील ! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच !’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. भगतसिंह कोश्यारींनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर लढाई सुरुच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शिवसेनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. आज राज्यपाल हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
खुद्द राज्यपालांनीच पदमुक्त होण्याची शक्यता व्यक्त केल्याचे कळते आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!’ असा टोला संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला लगावला आहे.
राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच!
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/MK1rWbhzcA— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, उदयनराजे भोसले आज पुण्याच्या पत्रकार परिषदेत भावूक झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान होताना पाहून वेदना होत आहेत, महाराजांबाबत गलिच्छ प्रतिमा तयार केली जात आहे, हे पाहून खूप दुःख होत आहे, महाराजांचे विकृतीकरण थांबवले पाहिजे, असे ते म्हणाले. 3 तारखेला ते रायगडावर सभा घेणार आहेत. नंतर राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
काल सभेत राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका केली आहे. महाराष्ट्रात शिव्यांची कमी नाही, राज्यपाल पदावर बसलेले आहात, म्हणून तुमचा मान राखतोय. गुजराती – मारवाडी महाराष्ट्रात का आले?, ते विचारा. महाराष्ट्र समृद्ध होताच. त्यामुळे महाराष्ट्रात काय आहे ते आम्हाला कोश्यारींनी सांगायची गरज नाही. काही दिवसांपूर्वी कोश्यारींनी गुजराती व मारवाडी महाराष्ट्रातून गेले तर काय होईल, असे विधान केले होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावर संभाजीराजे हे आक्रमक झाले आहेत. ‘कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !’ असे ट्विटकरुन त्यांनी सरकारला इशारा दिला.