सोलापूर : ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघातात निधन झाले आहे. पंढपूरजवळ एक फॉर्म्युनर कार 50 फूट खोल कालव्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी (ता. 27) रात्रीच्या सुमारास अपघात झाला. Solapur. Formuner car crashes into canal; Lavani artist Meena Deshmukh passed away Pandharpur Modlimb
या रस्त्यावरुन जाताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. यावेळी त्या मोडलिंबकडून पंढरपूरकडे चालल्या होत्या. फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली या अपघातात कलावंत मीना देशमुख यांचे निधन झाले. तर तीन जखमी झाले आहेत. पंढरपूर कुर्डुवाडी रस्ताच्या चौपदीकरणाचं काम सुरु असल्यामुळे या पुलावर नेहमी अपघात घडतात. रात्रीच्या वेळी या अरुंद पुलावरून जात असता कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली.
या अपघातात लावणी कलावंत यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची कन्या, नातं, आणि वाहन चालक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची कार ज्या कालव्यात पडली त्या ठिकाणी उतरायला जागा नाही. अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरु केले. रुग्णवाहिका बोलावून तातडीने दोऱ्याच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
स्थानिकांनी जखमींना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले आणि उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातात मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रात्री या रस्त्यावरील अरुंद पूल ओलांडताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खोल कालव्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे.
पंढरपूर – कुर्डूवाडी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असताना पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे या पुलाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा पूल सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आलंय.
अरुंद पुलामुळे या परिसरात अनेकदा अपघात हाेतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती अपघात हाेऊन बळीं जाण्याची वाट पाहणार आहेत असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर वृद्ध शेतकऱ्याचे नग्न आंदोलन
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे आहे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले आहे. ती नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याने कुमार नामदेव मोरे हे तहसील कार्यालयात आले होते. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट अंगावरील सर्व कपडे काढून नग्न आंदोलन केले.
दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर सोमवारी एका वृद्ध शेतकऱ्याने अंगावरील सगळे कपडे काढून नग्न अवस्थेत बराच वेळ ठिय्या मांडला होता. हे पाहण्यासाठी बघायची मोठी गर्दी झाली होती.
संबंधित शेतकऱ्याचे नाव कुमार नामदेव मोरे असे असून त्यांचे शेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले आहे. ती नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याने मोरे हे तहसील कार्यालयात आले होते. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट अंगावरील सर्व कपडे काढून नग्न आंदोलन केले.
संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला हे समजले असता ते तातडीने तेथे येऊन त्या शेतकऱ्याला कपडे घालण्यास लावले कार्यालयामध्ये नेऊन कागदपत्रे दाखवले असता दहा नोव्हेंबर रोजीच त्यांचा अतिवृष्टीचा मदत निधी बँकेकडे पाठवल्याची माहिती मिळाली. तेव्हा कुठे मोरे शांत झाले. एवढ्या दिवसात चेक कसा जमा झाला नाही? असा प्रश्न करत बँकेकडून चूक दिसून आल्यास त्या ठिकाणी मी नग्न आंदोलन करेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.