पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे माहेरहून पैसे घेऊन येत नसल्यामुळे पत्नीस बेदम मारहाण करून तिला गोचीड मारण्याचे औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली. Pandharpur Rath yatra attempt to kill wife by taking medicine
याप्रकरणी सुनील लक्ष्मण लामकाने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील याचा 2009 साली तालुक्यातील खेडभोसे येथील मनीषा हिच्याबरोबर विवाह झाला होता. मात्र दारूचे व्यसन असल्यामुळे लग्नानंतर काही दिवसातच त्याने पत्नीस माहेरहून पैसे आणावेत म्हणून जाचहाट सुरू केला. सुनील वारंवार पत्नीस शिवीगाळ करून मारहाण करीत होता.
यामुळे चार वर्षांपूर्वी मनीषाचे वडील विठ्ठल पवार आपल्या लेकीला माहेरी घेऊन आले होते. तसेच सुनील याच्या विरोधात न्यायालयात तक्रार देखील दाखल केली होती. मात्र हा वाद सामोपचाराने मिटवण्यात आला. यानंतर पुन्हा ती सासरी नांदण्यास आली. मात्र काही दिवसात पुन्हा त्याने माहेरहून खर्चासाठी पैसे आण म्हणून तगादा लावला व मारहाण सुरू केली होती.
9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मनीषा स्वयंपाक करीत असताना दारू पिऊन आलेल्या सुनीलने तिला पुन्हा शिवीगाळ करून घर खर्चासाठी वडिलांकडून पैसे आण म्हणून दमदाटी सुरू केली. तसेच उसाने मारहाण करू लागला. यामुळे मनीषाने पतीस घराबाहेर ढकलून घराचा दरवाजा बंद केला. मात्र त्याने खिडकी तोडून आत मध्ये प्रवेश केला व पत्नीला खाली पाडून घरात गोचीड मारण्यासाठी ठेवलेले औषध बळजबरीने तिला पाजले. हा गोंधळ पाहून मुलं, सासू व दीर धावून आले व तातडीने मनीषाला पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातून घरी आल्यानंतर मनीषा हिने पतीच्या विरोधात जाचहाट, मानसिक व शारीरिक त्रास तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यावरून आरोपी सुनील लामकाने यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● दहिफळ येथील यात्रेत रथाचे दगडी चाक पायावरून गेल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
सोलापूर – गावातील खंडोबाच्या यात्रेत रथाचे दगडी चाक पायावरून गेल्याने ६० वर्षीय वृद्ध शेतकरी गंभीर जखमी होऊन मरण पावले. ही दुर्घटना दहिफळ (ता. कळंब जि.उस्मानाबाद) येथे मंगळवारी (ता. 29) दुपारच्या सुमारास घडली.
गोरख निवृत्ती खंडागळे (वय ६० रा. दहिफळ ता.कळंब) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावात खंडोबाच्या यात्रेनिमित्त रथाची मिरवणूक निघाली होती. त्या मिरवणुकीत गोरख खंडागळे हे देखील दर्शनासाठी गेले होते. गर्दीमध्ये ते रथाजवळ खाली कोसळले.
त्यावेळी रथाचे दगडी चाक त्यांच्या दोन्ही पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उस्मानाबाद येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सचिन खंडागळे (मुलगा) यांनी दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले. मयत गोरख खंडागळे यांच्या पश्चात २ मुले आणि २ मुली असा परिवार आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.