उस्मानाबाद : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी काही रुग्णांनी आम्हाला काही औषधे मिळत नाहीत अशी तक्रार केली. तेव्हा पवार या तात्काळ औषध वाटप होत असलेल्या रुग्णांच्या रांगेत औषध घेण्यासाठी थांबल्या. औषध घेताना कॅल्शियमची गोळी उपलब्ध नसल्याचे सांगून ती त्यांना बाहेरून घेण्याचा सल्ला देण्यात आला. यावर मंत्री पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. Union Minister of State for Health Bharti Pawar has lined up Osmanabad Tanaji Sawant, but medicines are not available in the village of the State Health Minister.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात.काही दिवसांपूर्वीच सावंतांचा हाफकीनच्या औषधांचा व्हिडिओ चांगला व्हायरल होता.आता याच आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात मंत्री भारती पवार यांनी उस्मानाबाद रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात फिरत असताना पवार यांनी आपला मोर्चा औषध विभागाच्या दिशेने वळवला.त्यावेळी रुग्णाना सरास औषधे उपलब्ध नाही.ती बाहेरून आणा असा सल्ला दिला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.त्यामुळे या प्रकरणावरून आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भारती पवार उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात गेल्या असता, शासकीय रुग्णालयात औषधं उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यांना खासगी रुग्णालयातून औषधं खरेदी करण्यास सांगितली. यावरुनच भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. तर नागरिकांनी देखील यावेळी अनेक तक्रारी केल्या.
तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्य मंत्री आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पोलखोल केली आहे. शासकीय रुग्णालयात औषधं उपलब्ध नसल्याचे समोर आलं आहे. जिल्हा रुग्णालयाकडून खासगी मेडिकलमध्ये जाण्याचा सल्ला भारती पवार यांना देण्यात आला. त्यानंतर मंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तुलजापुर मे तुलजा भवानी माता के दर्शन करने का सौभाग्य प्राप्त हुआ। pic.twitter.com/apPUW9AdwY
— Dr.Bharati Pravin Pawar (Modi ka Parivar) (@DrBharatippawar) December 2, 2022
केंद्र सरकारनं काही नियम ठरवून दिले आहेत. त्या नियमांनुसार प्रत्येक शासकिय रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध असली पाहिजेत. प्रत्येक राज्याच्या मागणीनुसार औषधांसाठी बजेट दिलं जात असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या. जेव्हा मी उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिली तेव्हा लक्षात आले की, तिथे काही औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळं तत्काळ बैठक घेण्यात आली.
या बैठकीत तत्काळ औषधांची खरेदी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती भारती पवार यांनी दिली. रुग्णांना बाहेरुन औषधे विकत न आणण्याची वेळ येऊ नये अशाही सूचना दिल्या आहेत. आमचा आग्रह आहे की, सगळी औषधे रुग्णालयात मिळाली पाहिजेत असेही त्या म्हणाल्या.
मी स्वत:पेशंट म्हणून काही ठिकाणी अचानक भेटी देत आहे. तेथील परिस्थिती समजून घेत असल्याचे मंत्री भारती पवार म्हणाल्या. ग्राऊंड लेवलवर नेमकं काम कसं चाललं आहे पाहणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळं ठिकाठिकाणी भेटी देऊन माहिती घेत असल्याचे भारती पवार म्हणाल्या. जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या.
यावेळी भारती पवार या जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर काही रुग्णांनी आम्हाला काही औषधे मिळत नाहीत, ती बाहेरुन घ्या असे कर्मचारी सांगतात अशी तक्रार केली. तेव्हा भारती पवार या तत्काळ औषध वाटप होत असलेल्या रुग्णांच्या रांगेत औषध घेण्यासाठी थांबल्या. त्यांचा नंबर आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने रुग्णालयात औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले.
● राज्यात 4,122 पदांसाठी तलाठी भरती
राज्यात लवकरच तलाठी पदाच्या 4, 122 रिक्त पदांवर भरती होणार आहे. महसूल विभागाने प्रत्येक विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय तपशील सादर करण्यात यावे, असे सूचित केले आहे. नाशिक विभागात 1,035, औरंगाबाद विभागात 847, कोकण विभागात 731, नागपूर विभागात 580, अमरावती विभागात 183 तर पुणे विभागात 746 अशा एकूण 4, 122 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु होणार आहे.