उस्मानाबाद : उस्मानाबादचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजपचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात खडाजंगी झाली आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु होती. त्यावेळी दोघेही आक्रमक झाले होते. दोघांनी एकमेकांवर हमरीतुमरी केली. दरम्यान निंबाळकर व पाटील यांच्यात पुर्वापार वैर आहे. अनेक कारणांवरुन दोघांमध्ये कायम वाद होत असतात. Be honest between MP Omraj Nimbalkar and MLA Rana Jagjitsinh Patil Hamritumri Osmanabad
तु तूझ्या औकातित राहा असा दम खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज आमदार राणा राणाजगजितसिंह पाटील यांना देत जास्त बोलू नकोस, तुमचे संस्कार मला माहित आहेत असेही म्हटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या बैठकीत सर्वच अवाक झाले. पीक विम्यावरून दोघांची शाब्दिक चकमक झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज शिवसेना ठाकरे गट खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात हमरीतुमरी झाल्याचे पाहायला मिळाली. पीकविमा संदर्भात बैठक हाेती. ही बैठक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. दरम्यान भाजपा आमदार राणाजगजिसिंह पाटील हे इथे हजर होते. पाटील आणि निंबाळकर यांचे राजकीय हाडवैर पुन्हा एकदा जनतेच्या समाेर आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काही वेळानंतर खासदार ओमराजे निंबाळकर हे पोहचले आणि मला बैठकीचा निरोप का दिला नाही असा जाब जिल्हाधिकारी यांना विचारला. यावेळी राणा जगजितसिंह पाटील यांनी बोलायला सुरुवात केली. यावेळी खासदारांचा पारा चढला. ते आमदार पाटलांना म्हणाले तु तूझ्या औकातित राहा. जास्त बोलू नकोस असा दम भरला. हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी यांच्या समोर घडला. जिल्हाधिका-यांनी वाद वाढू नये यासाठी मध्यस्थी देखील केली.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप 2022 मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने 254 कोटी रुपये विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. मात्र नुकसान भरपाईच्या रकमेतील तफावतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्या आहेत. तसेच काढणी पश्चात नुकसान व पीक कापणी प्रयोगातून झालेले नुकसान यापोटी मिळणाऱ्या भरपाईचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होती. या वेळी तक्रार निवारण आयोजन करण्यात आले .
तक्रार निवारणाच्या अनुषंगाने चालू असताना लोकप्रतिनिधींना बोलवण्यावरून खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासमोर शाब्दिक चकमक झाली.
या बैठकीस लोकप्रतिनिधींना का बोलवण्यात आले नाही, असा सवाल जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांना ओमराजे यांच्यावतीने करण्यात आला, तेव्हा भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील ओमराजेंना उद्देशून “बाळा लोकप्रतिनिधी नसतो रे”असं बोलल्याने ओमराजे यांचा संताप अनावर झाला. त्यावर उत्तर देताना ओमराजे निंबाळकर चिडले. तू तू नीट बोल तुझ्या अवकातीत रहा तुझे संस्कार माहित आहेत .. अशा एकेरी भाषेत ओमराजे यांनी आमदा पाटील यांना खडे बोल सुनावले.