□ साहित्यिकांना जीवन गौरव पुरस्कार : शाहू महाराज, शरद पवारांची उपस्थिती
सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त पुण्यामध्ये एक दिवशी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनामध्ये चर्चासत्र आणि थोर साहित्यिकांचा गौरव केला जाणार आहे. या अधिवेशनासाठी कोल्हापूरचे शाहू महाराज आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली. Sambhaji Brigade’s Silver Jubilee Year Convocation Literary Lifetime Achievement Award at Pune on 28th December
संभाजी ब्रिगेड या सामाजिक संस्थेची १९९७ रोजी स्थापना झाली २०२२ मध्ये २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षा निमित्त एक दिवसीय अधिवेशन भरवण्यात येणार आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्या निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सदरचे अधिवेशन बुधवारी (ता. 28 डिसेंबर) सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. उद्घाटनाचे सत्र झाल्यानंतर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. पहिल्या सत्रामध्ये संवाद बहुजन समाजाची या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. विविध जाती धर्मामध्ये विविध प्रदेश पातळीवर काम करणाऱ्या सर्व नेत्यांना या चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.
दुसरे चर्चासत्र सुध्दा आरक्षणातून ‘अर्थकारण’ या विषयावर घेतले जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने मोठी चळवळ उभी केली. मात्र आरक्षण काही गेली ४० वर्षे झाले मिळाले नाही. १०३ वी घटना दुरुस्ती झाली मात्र लागू झालेल्या आरक्षणदेखील मिळालंले न्यालयालाने रद्द केले. त्यामुळे आरक्षणाचा लढा कितपत यशस्वी झाला याचा मागोवा घेऊन आरक्षणातून अर्थकारण या विषयावर चर्चा सत्र होणार आहे.
सध्या जागतीकरण वाढत आहे. सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण केले जात आहे. त्यामुळे ‘आरक्षण मिळून काय उपयोग’ याबाबत चर्चा केली जाणार आहे. याचा विचार करता जगभर उद्योग आणि शिक्षणासाठी गेले पाहिजे याबाबत प्रबोधन या चर्चासत्रामध्ये केले जाणार आहे. संभाजी ब्रिगेडने शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा चालवावा. आ. ह. साळुंखे, जयसिंगराव पवार यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.