□ निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांचे आवाहन
• सोलापूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड अद्ययावत असणे आवश्यक आहे. आधार कार्ड अद्ययावत नसेल तर शासनाचे मिळत असलेले लाभ रद्द होतील तसेच भविष्यात कोणतेही लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे आधारकार्ड अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. Update Aadhaar card if it’s been 10 years otherwise no benefit Solapur District Administration
ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून १० वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षापासून ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने सर्व नागरिकांना आधार कार्ड नोंदणी करणे तसेच ज्या नागरिकांनी यापूर्वी आधार कार्ड काढलेले आहे व त्याला १० वर्षे पूर्ण झाली असतील अशा आधारकार्डधारक नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे.
आधार कार्ड योजना सुरू झाली तेव्हा आधारकार्ड काढताना ज्यांनी कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत, त्यांना आता आधारमध्ये असलेले आपले नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आदी अद्ययावत करावे लागेल. तसेच डोळयांची बुबुळे, बोटांचे ठसे, चेहऱ्याचे सुधारित छायाचित्र द्यावे लागणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आधार कार्ड काढल्यानंतर दर ५ ते १० वर्षांनी आधार अद्ययावत करावे लागते. विशेषतः घराचा पत्ता बदललेला असेल तर किंवा लहान मुलांचे आधार कार्ड काढल्यानंतर त्यांना पाच वर्षांनी अपडेट करणे आवश्यक आहे. बोटांचे ठसे, चेहऱ्याचे छायाचित्र, बदललेला मोबाईल क्रमांक आदींमध्ये बदल करता येतो. पहिल्यांदा आधार कार्ड काढत असाल तर संबंधित केंद्राकडे आवश्यक कागदपत्रे द्यावी क लागतात. मुलाचे आधार कार्ड काढायचे असेल तर वडिलांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुलांच्या आधार कार्डाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार डेटामध्ये बायोमेट्रीक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे आणि तसे करण्याची प्रक्रिया निःशुल्क आहे.
यासाठी जन्म प्रमाणपत्र, गुणपत्रिका, ओळखीचा पुरावा, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र आवश्यक आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अद्याप आधार कार्ड काढले नसतील तर नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड काढून घ्यावे. तसेच विद्यमान आधार कार्डधारकांनी आपले आधार अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.