मुंबई : सध्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी चांगलाच संघर्ष सुरु आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Will enter Belgaum if party orders: MLA Shahajibapu Patil Seemavad borderism पक्षाने आदेश दिला तर मी थेट बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून येईन.. फक्त पक्षाने तसा आदेश द्यायला हवा, असे बापू म्हणाले आहेत.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. अशातच महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांनी बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असल्याचे जाहीर केले होते.
मात्र, कर्नाटक सरकारने कायदा सुव्यवस्थेचे कारण देत स्पष्ट शब्दात नकार दिला होता. यावरून संतप्त प्रतिक्रिया येत असताना सांगोल्या शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सांगोल्यात शनिवारी (ता. 3) दिव्यांग दिनाच्या निमित्ताने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर शहाजी बापू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्याची परवानगी नाकारल्याबाबत विचारण्यात आले होते. यासंदर्भात बोलताना, पक्षाने आदेश दिल्यास मी गमिनी काव्याने बेळगावात घुसून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून येईल आणि कोणाला कळूही देणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, सीमा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली होती. या पार्श्वभूमीवर हे दोघे 3 डिसेंबर रोजी बेळगावला जाणार होते. मात्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा दौरा स्थगित करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकाराल पत्र लिहिले.
महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला भेट देणं अनुकूल गोष्ट नाही. त्यांनी बेळगावात येऊ नये, यासाठी आम्ही त्यांच्याशी आधीच संपर्क साधला आहे. पण तरीही ते बेळगावात आले तर कर्नाटक सरकारची पूर्वीची भूमिका कायम राहील, असा इशारा बोम्मई यांनी दिला होता.
□ सोलापुरात कर्नाटक भवनसाठी 10 कोटी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर येथे कर्नाटक भवन बांधण्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत. गोवा, केरळसह सोलापुरमध्ये कर्नाटक भवन उभारणार असे बोम्मईंनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यात सीमावादावरुन संघर्ष उफाळून आला आहे. बोम्मई यांनी जत भागात पाणी सोडले होते आणि आता कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा याने आणखी संघर्ष होण्याची शक्यता आहे.