Wednesday, February 8, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

चिमणीचा विमानसेवेला अडथळा वाटत नाही; सुरू असलेला वाद निरर्थक : माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे

Chimneys do not seem to be a hindrance to aviation; Ongoing debate futile: Former Union Home Minister Sushilkumar Shinde

Surajya Digital by Surajya Digital
December 4, 2022
in Hot News, राजकारण, सोलापूर
0
चिमणीचा विमानसेवेला अडथळा वाटत नाही; सुरू असलेला वाद निरर्थक : माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : होटगी रोडवरील विमानतळावरून विमान सेवा सुरू होण्यास श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही,’ असे सांगून प्रवासी विमान सेवा सुरू होण्याबाबत ज्यांची ताकद आहेत, त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी सूचना माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. Chimneys do not seem to be a hindrance to aviation; Ongoing debate futile: Former Union Home Minister Sushilkumar Shinde Former MLA Vishwanath Chakote

 

विमानसेवेसाठी चक्री उपोषण करणारे सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांना सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांनी भर चौकात पिस्तूल काढून धमकावले होते. त्यानंतर मोठा वाद सोलापुरात झाला होता. मात्र, शिंदे यांनी एका फटकाऱ्यात सर्व विषय मोडीत काढत सोलापुरात विमानसेवा सुरू होण्यास अडथळा नसल्याचे स्पष्ट केले.

 

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सध्या सुरू असलेला वाद हा निरर्थक आहे. मी अनेकवेळा विमानातून आलो आणि गेलो. पण तेव्हा कधी हा प्रश्न आला नाही. आता अलीकडे माझ्या पंच्चाहत्तरीचा कार्यक्रम झाला, तेव्हा एकाच दिवशी २८ विमानांचे लँडिंग झाले होते. तेव्हा असा कोणताही प्रश्न निर्माण झाला नव्हता. उलट ज्यांचे वजन आहे, अशा लोकांनी
प्रवासी विमान सेवेबाबत संबंधित कंपन्यांकडे प्रयत्न केले पाहिजेत.

 

होटगी रोडवरील विमानतळावरून विमान सेवा सुरू होण्यासाठी कारखान्याची चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही. आम्ही बऱ्याचदा त्याच विमानतळा उतरतो, वर आजही उतरतो, सध्या सुरू असलेला वाद हा सर्व फूजूल आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

● होटगी रोडवरील बोरामणी विमानतळाचा पाठपुरावा करणे गरजेचे होते

 

बोरामणी विमानतळाबाबत मी माझ्या काळात प्रयत्न केले. पण, पुढे पाठपुरावा करणे गरजेचे होते, असे सांगून शिंदे म्हणाले की, बोरामणी विमानतळासाठी २०१० पासून भूसंपादनाचे काम सुरू झालं. जमीन ताब्यात आल्यानंतर विमानतळाच्या संरक्षक भिंतीचे काम झालं. मी २०१४ पर्यंतच होतो, त्यानंतरचं मला माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

 

》 होटगीरोड विमानतळ : व्हीआयपीसाठी ओपन सामान्यांसाठी क्लोज

– स्पष्ट आहे वस्तुस्थिती; तरीही विमानसेवेसाठी वादाची परिस्थिती

सोलापूर : होटगी रोडवरचे विमानतळ हे कधीही बंद नाही. या विमानतळावरून विमानसेवा सुरूच आहे. वर्षभरात जवळपास ३०० ते ३५० विमानांचे उड्डाण होते. अनेक व्हीआयपींच्या उड्डाणांसाठी ‘ओपन’ असणारे हे होटगीरोड विमानतळ सामान्यांसाठी ‘क्लोज’ कसे ? हा प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे.

शनिवार हाच प्रश्न अखिल भारतीय वीरशैव महासभेचे राज्याध्यक्ष तथा माजी आ. विश्वनाथ चाकोते यांनी उपस्थित केला. यावर ‘यासंदर्भातील वस्तुस्थिती केंद्रीय विमान वाहतूक मंत्री आणि डीजीसीएकडे मांडणे गरजेचे आहे’ असे सांगून ‘त्यासाठी पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामार्फत प्रयत्न करावे लागणार आहेत’, असा उपायसुध्दा चाकोते यांनीच शनिवारी पत्रकार परिषदेत सुचवला.

 

श्री सिध्देश्वर साखर कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. भाजप लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बोरामणी विमानतळाचे काम रखडल्याचा घणाघाती आरोप करत या कारखान्याला कोणत्याही प्रकारची बाधा न येता सोलापूरमधून विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीसुद्धा चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

सोलापूरचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे यासाठी प्रत्येकजण कार्यरत असताना एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करून वाद वाढवू नये. काडादी घराण्याचे सोलापूरच्या विकासात मोठे योगदान आहे. अनेक शिक्षण संस्था, उद्योग, कारखाने, संस्था त्यांनी लोकांच्या हितासाठी सुरू केल्या आणि त्या यशस्वीपणे सुरू आहेत. त्यांच्यावर वैयक्तिक टिका टिप्पणी टाळली पाहिजे. सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सुरू असलेल्या विमानसेवेचा प्रयत्न चांगला आहे.

 

त्यांचीही मागणी केवळ विमानसेवा सुरू व्हावी एवढीच आहे. चिमणी पाडा किंवा कारखाना बंद करा ; अशी त्यांची मागणी नाही. परंतु काही लोक कारखाना बंद पडावा म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत, असा विचार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. या पत्रकार परिषदेस विश्वराज चाकोते, केदार उंबरजे, गुरुनाथ आवजे, रियाज बागवान आदी उपस्थित होते.

 

 

■ शिष्टमंडळ घेऊन भेटणार

 

सर्वांनी एकत्रित येऊन एक शिष्टमंडळ तयार करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे कारखान्याची चिमणी टिकावी आणि सोलापूरमधून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा करून शासनाकडे हा प्रश्न मांडला पाहिजे. पालकमंत्री विखे पाटील यामध्ये लक्ष देऊन हा प्रश्न निकाली काढू शकणार आहेत. त्यांना शिष्टमंडळ घेऊन भेटणार असल्याचे चाकोते यांनी सांगितले.

● बोरामणी विमानतळ होणे अधिक महत्त्वाचे

 

सर्वांनी बोरामणी विमानतळासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी दूरदृष्टी ठेवून बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे म्हणून जागा मिळवून दिली. परंतु आता भाजप लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बोरामणी विमानतळाचे रखडल्याची टीका चाकोते यांनी केली. केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारकडे प्रयत्न होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

● समेट करण्यासाठी विनंती करणार

 

धर्मराज काडादी आणि केतन शहा हे मित्र आहेत. मात्र आता त्यांच्यात समज- गैरसमज आहेत. त्याचा फायदा इतर लोक घेत आहेत. त्या दोघातील गैरसमज दूर करण्यासाठी सुशीलकुमार शिंदेंना विनंती करणार असल्याचे चाकोते यांनी सांगितले. कारखाना टिकून विमानसेवा सुरू राहावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.

Tags: #Chimneys #hindrance #aviation #Ongoing #debate #futile #Former #UnionHomeMinister #SushilkumarShinde #FormerMLA #VishwanathChakote#चिमणी #विमानसेवा #अडथळा #वाद #निरर्थक #माजी #केंद्रीयगृहमंत्री #सुशीलकुमारशिंदे #विश्वनाथचाकोते
Previous Post

राजीनामा दे म्हणून सरपंचाला मारहाण; महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

सोलापूर । भावनिक स्टेटस ठेऊन डॉक्टरने केली आत्महत्या

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूर । भावनिक स्टेटस ठेऊन डॉक्टरने केली आत्महत्या

सोलापूर । भावनिक स्टेटस ठेऊन डॉक्टरने केली आत्महत्या

वार्ता संग्रह

December 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Nov   Jan »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697