सोलापूर – पूर्वीचे भांडण आणि सरपंच पदाचा राजीनामा द्यावा या कारणावरून घेरडी येथील सरपंचास लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. ही घटना सांगोला येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात सांगोल्याच्या पोलिसांनी एका महिलेसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. Sarpanch beaten to resign; Crime against 5 people including woman Sangola Solapur
या संदर्भात यशवंत दगडू पुकळे (वय ४२ रा.घेरडी ता.सांगोला) या सरपंचांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी बिरा पुकळे,अनिल मोठे, दिलीप मोठे, दगडू पुकळे आणि सखुबाई पुकळे (सर्व रा.घेरडी) अशा ५ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
घेरडी येथील सरपंच यशवंत पुकळे हे शुक्रवारी दुपारी राजेंद्र मोठे यांच्यासोबत सांगोला येथील तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी पूर्वीचे भांडण आणि सरपंच पदाचा राजीनामा दे, नाही तर तुला सोडत नाही. असे म्हणत त्यांना लाथाबुक्याने मारहाण केला. भांडण सोडवण्यासाठी राजेंद्र मोठे मध्ये पडले असता सखुबाई पुकळे या महिलेने त्यांना चप्पलने मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली. फौजदार ननवरे पुढील तपास करीत आहेत.
□ दुचाकीच्या अपघातामधील वृद्धाचा मृत्यू
दोड्डी (ता.दक्षिण सोलापूर) ते सोलापूर असेल दुचाकीवरून येताना उदगीरी पेट्रोल पंपाजवळ विजेच्या खांबाला धडकून जखमी झालेले अर्जुन राम चव्हाण (वय ६० रा.दोड्डी ता.दक्षिण सोलापूर) हे शासकीय रुग्णालयात उपचार घेताना शुक्रवारी सायंकाळी मरण पावले.
शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून जयाबाई काळे (वय ३०) त्यांच्या तीन मुली मेघा (वय ८) भाग्यश्री (वय ६) आणि वैभवी काळे ( वय नऊ महिने सर्व रा. दोड्डी) यांच्यासोबत सोलापूरकडे निघाले होते. त्यावेळी हा अपघात घडला होता. सर्व जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ कासेगाव येथे ८६ हजाराचे दागिने पळविले
सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे राहणाऱ्या शिवमाला भीमसेन कोळी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने रोख रकमेसह ८६ हजाराचे दागिने पळविले.
ही चोरी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. चोरट्याने दरवाजाचा कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. आणि कपाटातील १९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ हजार रुपये असा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी तालुका पोलिसात दाखल केली. फौजदार बनसोडे पुढील तपास करीत आहेत.
□ चिंतलवारवस्ती येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – मोदी खाना परिसरातील चिंतलवार वस्तीत राहणाऱ्या राहुल भिमण्णा व्हनकळस (वय २३) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना काल शनिवारी सकाळी उघडकीस आली. राहुल व्हनकळस याचा मृतदेह सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद सदर बझार पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. महिला हेड कॉन्स्टेबल सुपे पुढील तपास करीत आहेत.