अक्कलकोट : गौडगांव बु ll येथील श्री जागृत मारुती मंदिराचे गेटचे कुलूप व आतील गाभा-याचे दरवाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडली आहे. पोलीसात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याचे सांगितले. Akkalkot. Gaudgaon Jagurt Maruti temple hotel worker commits suicide by breaking the donation box
शनिवारी ( ३ डिसेंबर) रात्री ११ ते आज रविवारी (४ डिसेंबर ) पहाटे च्या सुमारास चोरट्याने प्रवेश करुन चोरी केल्याची माहिती आहे. दानपेट्यांचे व लोखंडी कपाटाचे व त्यातील स्टीलचे लहान पेट्याचे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम चोरुन नेले. अज्ञात चोरट्याविरुद्ध दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. देवस्थानचे सचिव प्रकाश मेंथे (वय ५६ वर्षे) यांनी फिर्याद दिली.
याबाबत दक्षिण पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील श्री जागृत मारुती मंदिरात दर्शनाकरीता येणारे लोकांसाठी मंदिरात दानपेट्या ठेवलेल्या आहेत ती मंदिराचे विकासासाठी दोन ते तीन महिन्यानी सदर दानपेटीतील रक्कम काढली जाते. या दानपेटीस कुलुप लावलेले असतात. शनिवारी रात्री ११ वाजता देवस्थानची दिवसभर विधीवत पुजा करुन सचिव व मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर नागेशी फुलारी व मंदिराचे सेवेकरी श्रीमंत सिध्दप्पा सावळतोट असे मंदिरातील लोखंडी कपाटात अन्नक्षेत्रातील व मंदिरातील पावती टेबलवरील स्टीलचे लहान ०६ डबे लोखंडी कपाटात ठेवुन कपाटास लॉक केले तसेच मंदिराचे व मंदिराचे बाहेरील सभामंडपाचे गेट यांना कुलुप लावुन घरी गेले.
आज रविवारी पहाटे ०५.१५ वाचे सुमारास मंदिराचे साफसफाई करणे करीता गेले असता मंदिराचे बाहेरील गेट उघडे दिसले व मंदिराचे गाभा-याचे दरवाजा देखील उघडे असल्याचे दिसले व बाजुस तुटलेले कुलुप पडले होते.
आत जावुन पाहिले असता मंदिरातील असलेल्या दानपेट्या व लोखंडी कपाटात ठेवलेली लहान स्टीलच्या दानपेट्या सर्व कुलुप तोडुन पडलेले दिसले व दानपेटीमधील सर्व रक्कम चोरून पोबारा केल्याचे प्रथमदर्शनी दिसले.
गावातील सरपंच श्रीशैल बनसोडे, उपसरपंच विरभद्र सलगरे, माजी सोसायटी चेअरमन शंकर पाटील, पोलीस पाटील सिध्दाराम सुतार व ज्ञानेश्वर नागेशी फुलारी व गावातील काही प्रतिष्ठीत लोक असे मिळून मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम चोरीस गेल्याने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यास फोन करुन सांगितले. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेस तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
श्रीकांत खानापूरे (अध्यक्ष देवस्थान) यांनी मंदिरात सीसीटीव्ही सुरू आहे. पण पंधरा दिवसाआधीच डीडीआर बदलले आहे. त्यामुळे रेकाँर्डिंक झाले नाही. तपासायला दिल्याचे सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 हॉटेल कामगाराची आत्महत्या
अक्कलकोट : येथील बॅगेहळ्ळी रस्त्यावरील एका ३२ वर्षीय हॉटेल कामगारने दारुच्या नशेत अज्ञात कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही घटना आज रविवारी (दि. ४) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. मृत विवाहित असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
जैनुद्दीन मलीक शेख (वय ३२ वर्षे, रा.बॅगेहळ्ळी रोड, अक्कलकोट ) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत उत्तर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनुद्दीन शेख हे शनिवारी हॉटेलमध्ये रोजच्या प्रमाणे काम करुन रात्री ११ वा. चे सुमारास घरी आले व जेवण करुन झोपले होते. झोपेतून जैनुद्दीन भाड्याने राहत असलेले घरी सासुबाईच्या मालकीचे नाईकवाडी गल्ली येथे जातो म्हणुन रात्री २ वा.चे सुमारास मेव्हणेच्या मोबाईल नंबर वर व्हिडीयो कॉल करुन मी गळफास घेत असल्याचे सांगितले.
तेव्हा पत्नी लगेच आई, वडील व भाऊबरोबर राहते घरी नाईकवाडी गल्ली येथे गेले असता घराचे दरवाजा बंद दिसला. मेहुणा तौफीक याने दरवाजा तोडून आत पाहिले असता जैनुद्दीनने साडीने लाकडी वाशास गळफास घेतलेला दिसला. लगेच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. मयताचे पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.