□ सीमाभागातील परिस्थिती गंभीर – पवार
मुंबई : बेळगाव सीमाभागात कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर पुढील 48 तासात परिस्थिती नियंत्रणात आली नाही, योग्य भूमिका घेतली नाही, तर मी बेळगावला जाणार, असे पवार यांनी म्हटले आहे. अनुचित प्रकार घडल्यास यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जबाबदार ठरणार, असेही पवार म्हणाले. Maharashtra truck pelted with stones in Karnataka; Ministers’ tour of Shinde government cancelled, Sharad Pawar aggressive Kannada Rakshana Vedika
बेळगाव सीमाभागात आज कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केली आहे. झालेला प्रकार निषेधार्ह असून सीमाभागातील परिस्थिती गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे. देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने हे घातक आहे, जर परिस्थिती चिघळली तर त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांना जबाबदार धरले जाईल, असे पवार यांनी म्हटले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव असताना बेळगावात पोलिस व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये आज वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बेळगाव जिल्ह्याधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे निवेदन घेण्यासही नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आज कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केली असून याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे आज 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावला भेट देणार होते. या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, हा दौरा रद्द केल्याचे सांगितले.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद चिघळला असतानाच मंत्री शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा आजचा बेळगाव दौरा तुर्तास रद्द करण्यात आला आहे. देसाई यांनी ही माहिती देतानाच आज बेळगावला जात नसून हा दौरा भविष्यात केला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच कर्नाटक सरकारची भूमिका चुकीची असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान शिंदे सरकारची ही माघार आहे, त्यांचा हा पराभव आहे, अशा शब्दात विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.
येत्या २४ तासांत हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल, असा रोखठोक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव – हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. तसंच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बेळगावात आज जे घडलं ते निषेधार्ह आहे. सीमाभागात काही घडतं तेव्हा कटाक्षानं सीमाभागातील काही घटक माझ्याशी संपर्क साधतात. माझ्याकडे जी माहिती आहे ती अतिशय चिंताजनक आहे. मराठी भाषकांवर दहशतीचं वातावरण आहे, कार्यालयासमोर त्यांचे पोलीस, महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चौकशी केली जात आहे. निवेदन देण्यासही मज्जाव केला जातोय. आज महाराष्ट्रातील ट्रकची तोडफोड केली गेली.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वक्तव्य देशाच्या ऐक्याला धोका देणारी आहे. महाराष्ट्रानं संयम पाळला पण त्यालाही मर्यादा असतात. सीमावाद सोडवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होत नसतील तर पुढे जाऊन कुणी कायदा हातात घेतला तर त्याच्या परिणामांची जबाबदारी सरकारची असेल. केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही”, असा स्पष्ट शब्दांत शरद पवार यांनी दोन्ही राज्यांच्या सरकारला इशारा दिला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच वादग्रस्त वक्तव्यांची सुरुवात झाली. पण त्यानंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून वाद शमवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. तेही काही होताना दिसलेलं नाही. आता दिवसेंदिवस वाद चिघळत आहे. दोन्ही राज्यांच्या प्रमुखांकडून यावर चर्चा होऊन वाद शमवण्याची अपेक्षा होती. पण तसं काही होताना दिसत नाहीय. आता १९ डिसेंबरपासून कर्नाटकचं अधिवेशन होणार आहे. ही देखील पार्श्वभूमी आहे. बेळगावातील मराठी भाषकांवर दहशतीचं वातावरण तयार केलं जात आहे”, असं शरद पवार म्हणाले.