□ 7 डिसेंबर 2022 रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील बार्डी, तुंगत, खेडभोसे, सुगाव खुर्द, खरातवाडी, मेंढापूर, नेमतवाडी, टाकळी गुरसाळे, अजोती, व्होळे, पुळूजवाडी या 11 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून, 11 ग्रामपंचायतीचे 38 प्रभाग आहेत तर 112 सदस्य संख्या आहे. Pandharpur. 11 Gram Panchayat: 60 applications for the post of Sarpanch and 421 applications for the post of member Solapur सरपंचपदासाठी 60 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 421उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उद्या बुधवारी (ता. 7 ) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
पंढरपूर तालुक्यात निवडणूक सुरु असलेल्या 11 ग्रामपंचायती आहेत. यामध्ये तुंगत ग्रामपंचायतीसाठी 5 प्रभाग असून सदस्य संख्या 14 आहे तर 4 हजार 140 मतदार आहेत. मेंढापूर ग्रामपंचायतीत 5 प्रभाग असून 14 सदस्य संख्या आहे तर 3 हजार 291 मतदार आहेत . व्होळे ग्रामपंचायतीसाठी 4 प्रभाग असून 12 सदस्य संख्या आहे.तर 2 हजार 527 मतदार आहेत. बार्डी ग्रामपंचायतीसाठी 3 प्रभाग तर 10 सदस्य संख्या आहे. तर 2 हजार 13 मतदार आहेत. खेडभोसे 3 प्रभाग तर 10 सदस्य संख्या आहे तर 1 हजार 951 मतदार आहेत, सुगाव खुर्द 3 प्रभाग तर 8 सदस्य आहेत तर 244 मतदार आहेत. खरातवाडी 3 प्रभाग तर 8 सदस्य संख्या तर 1 हजार 07 मतदार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
नेमतवाडी 3 प्रभाग तर 10 सदस्य संख्या तर 1 हजार 674 मतदार आहेत. टाकळी गुरसाळे 3 प्रभाग तर 8 सदस्य असून 531 मतदार आहेत. अजोती 3 प्रभाग तर 8 सदस्य तर 654 मतदार आहेत. पुळूजवाडी 3 प्रभाग तर 10 सदस्य संख्या असून 1 हजार 624 मतदार आहेत.
पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 11 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. 7 डिसेंबर रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत दुपारी 3.00 वाजेपर्यंत आहे. तर याच दिवशी उमेदवाराला निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर 18 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
पुळूजवाडी – अनु.जाती महिला, खेडभोसे-ना.मा.प्र.महिला, सुगाव खुर्द-अनु.जाती, खरातवाडी – ना.मा.प्र., मेंढापूर – अनु. जाती, बार्डी-अनु.जाती, अजोती-ना.मा.प्र. महिला, व्होळे – ना.मा. प्र. महिला, नेमतवाडी – ना.मा.प्र. महिला, टाकळीगुरसाळे – सर्वसाधारण महिला, तुंगत -सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी आरक्षण आहे.
● काशी विश्वनाथ कॉरीडॉरसारखे होणार पंढरपूर
वाराणसीतील काशी विश्वनाथ कॉरीडॉरप्रमाणे पंढरपूर तीर्थक्षेत्रही तसेच बनवण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. श्री विठ्ठल मंदिर ते चंद्रभागा नदीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. सुमारे 1,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पात रस्त्यांवरील दुकानांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. भाविकांसाठी पार्किंग तसेच सोयीसुविधा करण्यात येणार आहेत. पंढरपूर तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.