सोलापूर : वैराग – बार्शी ते सोलापूर रोडवरील शेळगाव जवळ ट्रक आणि वॅगनर मोटारीचा भयंकर अपघात होऊन मोटारीतील दोघेजण ठार तर एक जखमी झाला. हा अपघात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडला.अपघातामधील सर्वजण सांगलीचे राहणार असून ते बार्शी येथे लग्नकार्य आटपून सोलापूरकडे निघाले होते. Solapur. Two people in a car were killed when a truck collided with them while leaving the wedding; Early morning fatal accident Shelgaon Barshi
अमित अशोक कोथळे ( वय ३४ रा. भारत नगर, सांगली) आणि रघुनाथ भागवत डोरले (वय ३५ रा. दत्त चौक, सांगली) अशी मयताची नावे आहेत. याबाबत सांगली येथील रघुनाथ डोरले, अमित कोथळे आणी देशमुख असे तिघेजण बार्शी परिसरातील एका गावात लग्नासाठी आले होते.
लग्न उरकून ते सर्व एमएच१२ -एलजे -७०४५ या मोटारीतून सोलापूर मार्गे सांगलीकडे निघाले होते. सोलापूर होऊन शेळगाव मार्गे धामणगाव कडे येत असताना आज गुरूवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास समोरून एमएच-११-एएल-७००९ या क्रमांकाचा ट्रक धडकल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर दोन्ही मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयाकडे नेण्यात आले. या अपघाताची नोंद वैराग पोलिसात झाली असून सचिन मुंडे पुढील तपास करीत आहेत.
□ सोलापूर । शिक्षिकेवर बलात्कार, कॉन्ट्रॅक्टरला अटक, सुनावली पोलीस कोठडी
सोलापूर – हात उसने घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ केली.आणि मी तुला साथ देतो असे म्हणत एका शिक्षक महिलेवर बलात्कार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली.
या प्रकरणात जोडभावी पेठच्या पोलिसांनी राहुल मोहनराव माकणे (वय ४० रा.९०जी भवानी पेठ,अन्नपूर्णा नमकीन जवळ) या कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राहुल माकणे या कॉन्ट्रॅक्टरने एका ३५ वर्षीय शिक्षक महिलेकडून फेब्रुवारी २०१८ ते जून २०१९ या कालावधीत ४ लाख ६७ हजार रुपये हात उसने घेतले होते.त्यानंतर पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. आणि त्या महिलेस माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुला शेवटपर्यंत साथ देतो. तसेच नोकरीसाठी ८ ते १० लाख रुपये देतो असे म्हणत तिच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या घरात बोलावून वेळोवेळी अत्याचार केला. आणि तिला शिवीगाळ केली. असे पिडितेच्या फिर्यादीत नमूद आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी माकणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. महिला फौजदार व्हट्टे या पूढील तपास करीत आहेत.
● गुंगीचे द्रव पाजून मुलीवर अत्याचार; औसा येथील तरुणावर पोक्सोचा गुन्हा दाखल
सोलापूर – औसा (जि.लातूर) येथे एका शाळेत शिकणाऱ्या सोलापुरातील अल्पवयीन मुलीला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
या प्रकरणात एमआयडीसीच्या पोलिसांनी सुरम्या(रा.औसा) नावाच्या तरुणा विरुद्ध बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. आणि तो गुन्हा औसा येथील पोलिसाकडे वर्ग केला आहे.
ती १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी औसा येथील एका शाळेत शिकत होती. सप्टेंबर २०२२ मधील गणपती विसर्जनाच्या ४ ते ५ दिवसाने ती मुलगी शाळेतून दुपारी घराकडे निघाली होती. तेंव्हा सुरम्या नावाच्या तरुणाने तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले आणि तिला एका खोलीत नेऊन अत्याचार केला. त्यात ती गर्भवती झाली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक माने यांनी तक्रार नोंदवून घेऊन ती फिर्याद औसा (जि. लातूर) पोलिसाकडे नुकतीच वर्ग केली आहे.