सोलापूर : राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने गुरव समाजाचे महाअधिवेशन उद्या रविवार (दि. ११ डिसेंबर) दुपारी १ वाजता डि.एड् कॉलेज मैदान नेहरु नगर विजापूर रोड येथे होणार आहे. General convention of Gurav Samaj in Solapur on Sunday; Eknath Shinde Devendra Fadnavis will be inaugurated by Chief Minister and Deputy Chief Minister
या अधिवेशनाच्या उद्घाटनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ह.भ.प. अध्यात्म विवेकी गुरुवर्य ज्ञानेश्वर विष्णु महाराज (कोल्हापूर) यांच्या दिव्य सानिध्यात होणाऱ्या अधिवशेनास केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कर्नाटकचे जलसंपदा मंत्री गोविंद एम. कारजोळ, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. ओमराजे निंबाळकर, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदारांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या अधिवेशनामध्ये विविध ९ ठराव करून ते राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. गुरव समाजातील मान्यवरांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार असल्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस मल्लिकार्जुन गुरव, बाळासाहेब शिरसागर, यशवंत ढेपे, चंद्रकांत गुरव, देवेंद्र औटी, सुनील गुरव आदी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》सोलापुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंच्या पुतळ्याचे दहन, शिंदे गटाची युवा सेना झाली आक्रमक
सोलापूर : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुतळा जाळला होता. आता शिंदे गटाने याला प्रत्युत्तर दिले आहे. सोलापूरात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे गटाच्या युवासेनेने समितीला कर्नाटकात घुसून तुमच्या नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करू, असा इशाराही दिला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे हा पुतळा जाळला. युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख सुजित खुर्द, शिवसेना उपशहर प्रमुख शिवराज विभुते, किशोर चव्हाण, युवासेना उपशहर प्रमुख पद्मसिंह शिंदे, ऋषी घोलप उपस्थित होते.
कर्नाटकाला हवी आहेत महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक गावे. महाराष्ट्राला हवा आहे बेळगावसह निपाणी आणि कारवार. त्यातून निर्माण झाला आहे कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या वादाला कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी फोडणी दिल्यामुळे दोन्ही राज्यात सीमावर्ती भागामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही राज्ये एकमेकांना ‘देत नाही… अन् सोडत नाही..’ अशी भाषा वापरत असल्यामुळे सीमावादाचा राग पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यातूनच कर्नाटकात महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रात कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्यांना आग लावण्याचा सार्वजनिक कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग शुक्रवारी सोलापुरात पाहण्यास मिळाला.
शिवाजी चौकात गांधीगिरी मराठा क्रांती मोर्चा व छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्नाटक सरकार विरोधात गांधीगिरी पध्दतीने कर्नाटक बसच्या चालक- वाहकाचा सत्कार करून त्यांना पेढे भरवण्यात आले. महाराष्ट्राच्या वाहनावरील हल्ले थांबवले नाहीत तर जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.