मुंबई : उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर एका व्यक्तीने शाईफेक हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना घडण्याआधीच राष्ट्रवादीतून शाईफेक करणाऱ्याला 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते, या प्रकरणी शाई फेकीस चिथावणी दिल्याप्रकरणी आता राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, , शाईफेकीनंतरही पैसे देणार असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीने जाहीर केला होता. Shaihalla – Ajitdad protested Ajit Pawar, but police suspended reward of 51 thousand from NCP
फुले, आंबेडकर आणि कर्मवीरांबद्दल केलेल्या विधानामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली आहे. मी चळवळीतला माणूस आहे, मी कुणाला घाबरत नाही, असे पाटलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही झुंडशाही सहन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री चंद्रकांत पाटलांवर काल एकाने शाही फेकली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचे पूर्ण चुकीचे आहे. त्याचा मी निषेधच करतो. पण त्यांनी असे वक्तव्य केले म्हणून त्यांच्यावर शाही फेकणे हेही तितके चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोणी कायदा हातात घेऊ नये. मी या घटनेचा निषेध करतो, असे ते म्हणाले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या
चेहऱ्यावर शाई फेकणारा मनोज भास्कर गरबडे हा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आहे. मनोज सोबत विजय धर्मा ओव्हाळ व धनंजय ईचगज या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रकांत पाटील चिंचवडमधील एका महोत्सवाचा शुभारंभ करायला आले होते. त्यावेळी कार्यक्रमस्थळी पोहचण्यापूर्वी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ही घटना घडण्याआधीच राष्ट्रवादीतून शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी आता 14 जणांवर बारामतीत गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्याचे पालकमंत्री तथा भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. जी व्यक्ती चंद्रकांत पाटील यांना काळे फासण्याचे काम करेल. त्याला 51 हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर एका युवकाकडून चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्यानंतरही हे बक्षीस लवकरच मनोज बरकडेला दिले जाईल हा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता. या संदर्भात बारामती शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी शाईफेकीवरून गंभीर आरोप केले आहेत. “हा हल्ला प्रिप्लॅन होता, कोणत्यातरी पत्रकाराने हे कृत्य केले आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
○ शाईहल्ला – 11 पोलिसांचे निलंबन
उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर एका व्यक्तीने शाईफेक हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बंदोबस्त ठेवण्यात हलगर्जी केल्याप्रकरणी 11 पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यात 8 पोलिस कर्मचारी व 3 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चंद्रकांत पाटील काल पिंपरीत मोरया गोसावी या गणपती देवस्थानाच्या संजीवन समाधी सोहळ्याला हजेरी लावणार होते, तेव्हा शाईहल्ला करण्यात आला.