● पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर एम्स, मेट्रोसह समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
नागपूर : समृद्धी महामार्ग शेती, कृषी, उद्योग यासाठी पूरक असून यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधांचा पाया आहे. यातून सर्वसामान्यांचा विकास निश्चित होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच 45 कोटी जनतेला बँकेशी जोडणारे जनधन योजना, सगळ्या जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज उघडण्याची योजना या सर्व पायाभूत सुविधांना मानवी चेहरा आहेत, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालय नागपूरचे उद्घाटन केले आहे. त्यांनी येथील विविध प्रकल्पाचे उद्घाटन केले. बाह्य वैद्यकीय सेवा विभागासह 38 विविध विभागाच्या सुसज्ज एम्सचे उद्घाटन त्यांनी केले. मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी 2017 मध्ये या रुग्णालयाच्या पायाभरणी ही पंतप्रधानांच्या हस्ते झाली होती. दरम्यान, मोदी यांनी नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी, माझा शॉर्टकटच्या विकासावर विकास नाही, माझा शाश्वत विकासावर विश्वास आहे. महाराष्ट्रात ज्या 11 प्रकल्पाचे उद्घाटन झाले, ते तुम्हाला नवीन संधी देतील. अनेक राजकीय पक्ष शॉर्टकटच्या विकासातून राजकारण करत आहेत. ‘आमदनी अठन्नी व खर्चा रुपया’ हे धोरण अर्थव्यवस्थेला घातक आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास हा महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील टेम्पल ग्राऊंडवरुन संबोधित केले. यावेळी त्यांनी संकष्ट चतुर्थी निमित्त नागपुरातील टेकडी गणपतीचे वंदन करु भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी 11 विविध योजनांमुळे महाराष्ट्राला विकासाला दिशा मिळेल. डबल इंजिन सरकार हे वेगाने काम करत आहे, असे म्हणत सरकारचे कौतूक केले. त्यांनी नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग, एम्स, वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. त्यांनी यावेळी मेट्रोमधून प्रवासही केला. या प्रकल्पाची एकूण लांबी 40 किलोमीटर असून एकूण खर्च 9 हजार 279 कोटी रुपये आहे. प्रवासी क्षमता 1 लाख 50 असणार आहे. त्याचबरोबर नागपूर मेट्रो दोन या प्रकल्पाचा शुभारंभ त्यांचा हस्ते झाला. नागपूर मेट्रो-2 हा एकूण 6,708 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.
नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाबद्दल मी नागपूरकरांचे अभिनंदन करतो. आज दोन मेट्रो गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आणि मेट्रोतून प्रवासही केला. मेट्रो प्रवास अत्यंत आरामदायी आणि सोयीस्कर आहे. pic.twitter.com/FWlo97GOvC
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नागपूरमधील वायफळ टोलनाक्यावर त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यांनी या महामार्गावर 10 किलोमीटरचा प्रवासही केला. नागपूर ते शिर्डी या 701 किलोमीटरच्या सहा पदरी या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. दरम्यान, त्यांनी नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले.
आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन झाले. पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील रु. 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण झाले. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे.
नागपुरातील नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा II ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाले. पंतप्रधानांनीच जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित केले. नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवला. नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाले.
’20 वर्षांआधी आम्ही स्वप्न पाहिलं होतं. पण तुम्ही नसता तर हे स्वप्न पूर्ण झालं नसतं. तुम्ही ताकद दिली म्हणून हा महामार्ग होऊ शकला आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. आगामी काळात 50 हजार कोटी रुपये महसूल देईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. याच मार्गावर सेमी हायस्पीड कार्गो रेल्वे चालू करण्याचा आमचा विचार आहे. यासाठी जागा सुद्धा पाहिली आहे. सीएनजी गॅस पाइपलाईनचा विचारही केला आहे. येणाऱ्या काळात याचा फायदा सगळ्यांना होईल. आगामी काळात नागपूर विमानतळाचे ही भूमिपूजन होणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.
● उपमुख्यमंत्री बसले मुख्यमंत्र्यांच्या जागेवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांची येथील टेम्पल ग्राउंडवर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. मुख्यमंत्री बोलत असताना पंतप्रधानांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी त्यांनी आपली खुर्ची सोडून पंतप्रधानांच्या बाजूच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून मोदींसोबत चर्चा केली. नंतर फडणवीस आपल्या जागेवर जाऊन बसले.