→ नोव्हेंबरमध्ये १७५ वीजचोऱ्या आल्या उघडकीस
→ सोलापुरातील नातेपुते वीज चोरीचा समावेश
सोलापूर : नोव्हेंबर मध्ये महावितरणच्या भरारी पथकाने पुणे प्रादेशिक विभागात ३ कोटी ५६ लाख ६० हजार रुपयांची १७५ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. थडक कारवाई मुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे. उघडकीस आणलेल्या वीज चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. Solapur. Mahavitaran caught electricity thefts worth crores of rupees in Pune
नोव्हेंबरमध्ये पुणे ग्रामीण भागातील उरुळीकांचन परिसरात रात्रीच्या वेळी भरारी पथकाने धाड टाकून पेट्रोल पंपाची वीजचोरी उघडकीस आणलेली. सदर व्यावसायिक ग्राहकाने मीटरला जंपर टाकून बायपास करून करण्याची तरतूद केलेली होती. ग्राहकास ९० हजार १७९ युनिटचे १९ लाख ४२ हजार १८२ रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.
दुसऱ्या प्रकरणात पुणे शहर भागातील ८० केडब्ल्यू जोडभार असलेल्या व्यावसायिक ग्राहकाची वीजचोरी पकडण्यात आली. सदर व्यावसायिक ग्राहकाने मीटरच्या आधी एल. आहे. टी. केबलला टॅप करून मीटर बायपास करून वीजचोरी केलेली होती. सदर ग्राहकांनी ८० हजार ४३८ युनिट्सची चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून त्यांना २८ लाख १४ हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.
तिसऱ्या प्रकरणात कोल्हापूरमधील इचलकरंजी आगामी भागातील ९१ एच. पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाची वीजचोरी उघडकीस आलेली आहे. सदर औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले व ९० हजार २०८ युनिटस् चोरी केल्यामुळे त्यांना १५ लाख २१ हजार ७१० रुपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूरमधील नातेपुते भागातील ६० एच. पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाची वीजचोरी उघडकीस आलेली आहे. सदर औद्योगिक ग्राहकाने दुसऱ्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवरून एल. टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीजचोरी केल्यामुळे त्यांना ६९ हजार ५५५ युनिट्सची वीज चोरी केल्यामुळे ११ लाख ५५ हजार ३०० रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.
आगामी काळात वीजचोरांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंपल यांनी दिले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार हे पुणे प्रादेशिक विभागातील वीज चोरांवर कडक पाळत ठेवत आहेत.
● पुण्यात साडे तीन कोटींची वीजचोरी
महावितरणच्या पुणे विभागाने नोव्हेंबर महिन्यात मोठी वीजचोरी उघडकीस आणली आहे. पुणे विभागात जवळपास 3 कोटी 56 लाख रुपयांची वीजचोरी प्रकरण उघडकीस आली आहेत. महावितरणच्या भरारी पथकाने ही थेट कारवाई केली आहे. वीजचोरीच्या प्रकरणात कारवाई होत असल्याने वीज चोरी करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. वीजचोरी करणाऱ्या व्यावसायिकांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.