पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध करण्यासाठी पुण्यातील शिवप्रेमी संघटनांनी आज (13 डिसेंबर) पुणे बंदची हाक दिली आहे. पुणे बंदमुळे बाजारात शुकशुकाट दिसत आहे. Pune bandh today by Shivpremi organizations, Shukshukat rickshaw organization in the market
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या बंदला पाठींबा जाहीर केला आहे. बंदला पाठींबा देण्यासाठी पुण्यातील बाजारपेठ व दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत बंद असणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यातील दुसरी सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आलीय. एरव्ही इथे पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला येत असतो. पण आज इथे शुकशुकाट दिसत आहे. शेतकऱ्यांनीही या बंदला प्रतिसाद दिला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पुण्यात बाईक-टॅक्सीविरोधात रिक्षा चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता वेगळं स्वरुप मिळताना दिसतंय. कारण रिक्षा चालक आज चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आपल्या रिक्षा आंदोलनस्थळी सोडून ते तिथून निघून गेले आहेत.संगम ब्रिज येथील आरटीओ (RTO) कार्यालयासमोर मोठ्या संख्येने रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले. तर दुसरीकडे जवळपास 200 पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने घडामोडींना वेग आला. परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रिक्षा चालक आक्रमक झाल्यानंतर आता पोलीस रस्त्यावर उतरले. पोलीस स्वतः रस्त्यावर उतरले. पोलीस हे स्वतः रिक्षा रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम केले.
पुण्यात काल (12 डिसेंबर) रिक्षा चालक संघटनांनी आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले. याप्रकरणी ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे. काल संध्याकाळी रिक्षा चालकांनी आरटीओ चौकात रिक्षा रस्त्यात लावल्या होत्या. रात्री उशिरा पोलिसांनी येऊन त्या बाजूला केल्या. यात 30-40 रिक्षा चालकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते.
पुण्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी जीवनावश्यक श्रेणीत असल्यामुळे इंधन पंप सुरु राहणार आहेत. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित दुकाने सुरु राहतील. दूध, बेकरी उत्पादने विक्री करणारी दुकाने सकाळी 10 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. पुण्यातील दुकाने व बाजारपेठ दुपारी 3 वाजेनंतर सुरु होतील. भव्य मूक मोर्चाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.