मुंबई : हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत या महामार्गावर पहिल्या अपघाताची नोंद झाली आहे. वायफळ टोल नाका येथे दोन कारची धडक झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. Within 24 hours of the inauguration, the first fatal accident took place on the Samriddhi Highway
दोन्ही कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले होते. समृद्धी महामार्गाचं रविवारी (ता. 11) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं, पण या लोकार्पणाच्या 24 तासांमध्येच महामार्गावर अपघात झाला आहे.
टोलनाका जवळ आला म्हणून एका गाडीने वेग कमी केला. तेवढ्यात मागून एक कार वेगाने आली व त्या गाडीवर धडकली. टोलनाक्यावर असलेले कर्मचारी तत्काळ अपघात झालेल्या वाहनांजवळ गेले. दोन्ही वाहनांतील प्रवाशांपैकी कोणीही जखमी झाले नाही. वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांत याची तक्रार करण्याचा सल्ला नुकसान झालेल्या गाडीच्या चालकाला टोलनाका कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला. दोन्ही वाहन चालकांनी सामोपचाराने यावर तोडगा काढल्याने पोलिसांत याची तक्रार झाली नाही. पोलिसांनी स्टेशन डायरीत अपघाताची नोंद करुन घेतली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
वायफळ टोलनाक्यावर एक कार हळुवार जात असताना मागून आलेल्या दुसऱ्या कारने जोरदार धडक दिली, यामध्ये टोलनाक्यावर समोर असलेल्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. दुपारी झालेल्या या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. समृद्धी महामार्गावरचा हा पहिलाच अपघात असावा.
रविवारी हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दुसऱ्याच दिवशी एसटी महामंडळाने या महामार्गावरून नागपूर- शिर्डी विना वातानुकुलीत बस सेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून 14 जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अविकसित राहिलेले हे दोन भूप्रदेश महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.