■ पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. कुलकर्णी, राजापूरकर, चौगुले, साळुंखेंची समिती
■ १४ ते १६ डिसेंबर दरम्यान होणार कार्यालयाची तपासणी
सोलापूर : सोलापूर उपविभागीय क्रमांक एकचे अधिकारी हेमंत निकम यांच्या भ्रष्ट कामाविषयी अनेक तक्रारी शासन पातळीवर दाखल झाल्या आहेत. याकामाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी आहे. या तक्रारीची दखल घेतली आहे. Committee to investigate the corrupt work of District Magistrate Hemant Nikam in Solapur
दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथील उपजिल्हाधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, सह जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे यांची नियुक्ती केली असून १४ ते १६ डिसेंबर तीन दिवस निकम यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेत तपासणी केली जाणार आहे.
निकम यांच्या गैर कामांविषयी अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. याबाबत विभागीय आयुक्त, केंद्रशासन, राज्यशासन आणि सीबीआयकडे तक्रारी दाखल आहेत. माजी मंत्री ॲड. दिलीप सोपल, सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते संदीप शितोळे, जयराज नागणसुरे यांनी तक्रारी करत निकम यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन तीन जणांच्या समितीची नियुक्ती केली आणि पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती सोलापुरात १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणार आहे.
सलग तीन दिवस निकम यांच्या कार्यालयाची तपासणी केली जाणार आहे. तसे पत्र तपासणी अधिकारी आणि तक्रारदार तसेच निकम यांना प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते. निकम यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्व महसुली कामांच्या सर्व संचिका तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना तपासणी पथकाच्या अध्यक्षांनी दिल्या आहेत.
■ काय आहे नेमके प्रकरण
पदावर नसताना राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या जमिनीचा बोगस निवाडा देऊन तब्बल सात कोटींचा अपहार केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संदीप शितोळे यांनी केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या सीबीआयकडे केली आहे. प्रकरणाची चौकशी करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
■ निवाडा बदलण्याचा अधिकार कोर्टास
भूसंपादन केलेल्या जागेचा निवाडा झाल्यानंतर त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार न्यायालयास आहे. निकम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पदावर नसताना कागदपत्रामध्ये फेरफार करत निवाडामध्ये बदल करत शासनाची फसवणूक केली. या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत निकम यांची चौकशी करण्याची मागणी आहे. याबाबतचे सर्व पुरावे दाखल केले आहेत. चौकशी समितीपुढे पुन्हा हे पुरावे सादर केले जातील, असे तक्रारदार संदीप शितोळे यांनी सांगितले.
● जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन वेळा तपासणी
हेमंत निकम यांच्या कार्यालयाची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन वेळा तपासणी केली आहे. काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. निकम यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.. आता या तपासणी पथकाच्या माध्यमातून काय सिध्द होते हे पाहावे लागणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पंढरपूरच्या कॉरिडॉरविरोधात भाजपचे डॉ. स्वामी उतरले मैदानात, नरेंद्र मोदींना म्हणाले रावण
पंढरपर : भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांना रावण म्हटले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रावणासारखे धार्मिक असल्याचे दाखवत उत्तराखंड व वाराणसी येथील मंदिरं पाडली. आता फडणवीस यांच्यासोबत ते पंढरपूरमधील धार्मिक स्थळ पाडण्याचे नियोजन करत आहेत. हा नरसंहार रोखण्यासाठी मी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे’, असे ट्विट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
राज्य सरकारकडून पंढरीत साकारल्या जाणाऱ्या माउली कॉरिडॉर विरोधातील लढ्यात आता माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी उतरले आहेत. विठ्ठल मंदिर परिसरात अनेक पुरातन मंदिरे, वारकरी संप्रदायाच्या प्राचीन श्रध्दा असणारे वाडे आणि इतर वास्तू आहेत. त्या उद्ध्वस्त करून कॉरिडॉर बनवण्यात येणार असल्याने याविरोधात वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढू, असा इशारा सुब्रमण्यम स्वामींनी दिला आहे.
रविवारी सकाळी वारकरी संप्रदायाचे प्रमुख पदाधिकारी आणि नागरिकांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. स्वामी यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. प्रथम राज्य सरकारशी बोलू, न ऐकल्यास थेट न्यायालयातून रद्द करु, असे स्पष्ट करून डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, ज्या पध्दतीने काशीत देखील पुरातन मंदिरे पडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत कॉरिडॉर केला, त्यावरून त्यांची मानसिकता काय असेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माउली कॉरिडॉरला नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे.
हा कॉरिडॉर कोणालाच नको असल्याच्या भावना नागरिकांनी डॉ. स्वामी यांच्यासमोर व्यक्त केल्या. विठ्ठल मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार घाट हा माउली कॉरिडॉर हा खरा वादाचा मुद्दा असून मंदिर परिसरातील रस्ते थेट २०० फुटापर्यंत वाढवण्याचे नियोजन प्रशासन करत आहे. सध्या मंदिर परिसरात केवळ ६० फुटांचे रस्ते असून अजून जवळपास १४० फूट रुंदी वाढल्याने केवळ या कॉरिडॉरमुळे जवळपास एक हजारापेक्षा जास्त नागरिकांची घरे आणि दुकाने जमीनदोस्त होणार असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यातून काढण्यासाठी भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी कंबर कसली आहे. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर है सरकारमुक्त करण्यासाठी स्वामी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. यासाठी लवकरच ते पंढरपूरला येणार असल्याची माहिती आहे.
● स्वामी पंढरपुरात येणार
यापूर्वी डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी या कॉरिडॉर विरोधात ट्विट करताना रावणासारखे मोदी स्वतःला धार्मिक असल्याचा दावा करत वाराणशी, उत्तराखंडमध्ये मंदिरे पाडत आहेत. आता पंढरपूरच्या पवित्र स्थळांची नासधूस करण्याची फडणवीस यांच्यासोबत योजना आखात आहेत. त्यामुळे हे थांबवण्यासाठी मी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याच्या तीव्र भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
एकंदर माउली कॉरिडॉरला सर्वच पक्षांचा विरोध आहे. आता याच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी पुढे आहेत. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारला यावर विचार करावा लागणार आहे. लवकरच सुब्रमण्यम स्वामी पंढरपूर येथे येऊन विठुरायाची पूजा करणार असून कॉरिडॉर प्रकरणाची सर्व माहिती घेणार आहेत, असे सांगण्यात आले.