सोलापूर : कुर्डूवाडीच्या (ता. माढा, जि. सोलापूर) हद्दीत एका महाविद्यालयीन तरुणाला अटक करून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. ग्रामीण गुन्हे शाखेने खोलात तपास करून आणखी तिघांना अटक केली. त्यामुळे या टोळीची संख्या चार झाली आहे. Three more arrested in Solapur fake note case, customers were looking for notes printed in institute
या कारवाईत अटकेतील आरोपींकडून प्रिंटर, संगणक, नोटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हर्षल शिवाजी लोकरे (वय २० रा. कंदर, ता. करमाळा), सुभाष दिगंबर काळे ( वय ३६, भोसरे – ता. माढा), प्रभाकर ऊर्फ गणेश सदाशिव शिंदे (वय ३८, रा. शाहू नगर, भोसरे), पप्पू भारत पवार (वय ३० रा. अर्जून नगर, करमाळा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने १५ डिसेंबरपर्यंतच्या कोठडीत वाढ करण्याचा आदेश दिला आहे.
पोलिसांनी या चौघांना अटक करून अधिक माहिती विचारली असता, त्यांनी आयुष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी, किंवा कोणताही एक व्यवसाय करण्यासाठी हा बनावट नोटांचा उद्योग सुरू केल्याची माहिती दिली. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी अधिकृत माहिती मंगळवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● इन्स्टिट्यूटमध्ये छापल्या नोटा :
पप्पू पवार याने डीटीपी संगणक कोर्स पूर्ण झाला आहे. पप्पू करमाळा तालुक्यातील कंदर या ठिकाणी आर्यन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली होती. अनेक विद्यार्थ्यांना येथून त्याने संगणकाचे धडे दिले. चार महिन्यांपूर्वी पप्पू पवार, हर्षल लोकरे, सुभाष काळे, प्रभाकर शिंदे हे एकत्र आले आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी प्लॅनिंग केलं. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता, म्हणून त्यांनी बनावट नोटा छापून पैसे जमा करण्याचा डाव आखला. पप्पू पवार हा डीटीपीमध्ये तरबेज होता. त्याने पुणे येथील उरुळी कांचन या ठिकाणी भाड्याने खोली घेतली आणि जवळपास ६ लाखांच्या बनावट नोटा छापल्या.
● ते शोधत होते ग्राहक :
हुबेहूब ५०० च्या नोटा छापल्यानंतर चौघे ग्राहक शोधत होते. त्यावेळी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेला याची माहिती मिळाली. त्यांनी ताबडतोब बनावट नोटा घेऊन येणाऱ्यांवर पाळत ठेवली. ३ डिसेंबर रोजी हर्षल लोकरे यास ताब्यात घेऊन ५०० रुपयांच्या ४९३ बनावट नोटा जप्त केल्या. त्याला खाक्या दाखवताच हर्षलने पोपटासारखी माहिती दिली. त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष काळे याला टेंभुर्णी येथे महामार्गावर ५०० रुपयांच्या ५८० नोटा जप्त केल्या.
● १०० बनावट नोटा जप्त :
त्यानंतर प्रभाकर उर्फ गणेश शिंदे याला अटक करून ५०० रुपयांच्या १०० बनावट नोटा जप्त केल्या. अशा प्रकारे पोलिसांनी ५ लाख ८६ हजारांच्या बनावट नोटा जप्त करून पोलीस कोठडीत रवानगी केली. हुबेहूब बनावट नोटा छापणाऱ्या पप्पू पवार याला पुण्यातील उरुळीकांचन येथून अटक केले व संगणक, प्रिंटर व इतर साहित्य जप्त केले.
○ भलताच उद्योग सुरू केला :
चौघांना पैशांची खूप गरज होती. हॉटेल व्यवसाय सुरू करून ते एक चांगले आयुष्य जगणार करणार होते. पण व्यवसाय सुरू करण्यासाठी खऱ्या नोटांची गरज होती. ती गरज भागवण्यासाठी या चौघांनी बनावट नोटा छापण्याचा भलताच उद्योग सुरू केला आणि ते गुन्हे शाखेच्या हाती लागले. यामध्ये पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक धंनजय पोरे यांनी दिली. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी अधिकृत माहिती दिली.
》 सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे सोलापूर झेडपीच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी
सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 24 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमी मसूरी या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांच्याकडे दिला जाणार आहे तसे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी दुपारी काढले.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी काढलेल्या आदेशामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्यासह राज्यातील 29 प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा आदेश मंगळवारी सकाळच्या सुमारास निघाला त्यानंतर दुपारच्या सुमारास पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा आदेश निघाला. त्या आदेशामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवार 16 डिसेंबर रोजी आपला पदभार सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे हे मसुरीला ट्रेनिंगसाठी जाऊन आल्यानंतर काही दिवसात त्यांची नांदेड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. दिलीप स्वामी हे ट्रेनिंग वरून आल्यानंतर त्यांनाही पुढील पोस्टिंग दिली जाऊ शकते.