》दिपिका, शाहरुखचे पुतळे जाळले, भगव्या बिकनीवरून पेटला वाद
मुंबई : ‘पठाण’ चित्रपटातील एका गाण्यात दीपिका पादूकोनने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून चांगलाच वाद रंगला आहे. अशातच आता अभिनेत्री पायल रोहतगीने यावर केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे. जर दीपिका यात तुम्हाला अश्लील वाटत असेल तर आपल्याच देशात पॉर्नसारखी गोष्ट तुम्ही कशी सहन करता. आपल्या मनोरंजनसृष्टीत तर एका पॉर्नस्टारला अभिनेत्रीचा दर्जा दिलेला आहे. हा दुटप्पीपणा थांबवला पाहिजे, असे पायलने म्हटले आहे. So how do you tolerate something like porn; Shah Rukh Khan Deepika Padukone Supports Actress Payal Rohatgi’s Bikini In ‘Pathan’
मध्य प्रदेशमधील इंदोर येथे पठाण चित्रपट व त्यातील बेशरम रंग या गाण्याचा वीर शिवाजी संघटनेने विरोध केला आहे. दिपिका पदुकोण व शाहरुख खान यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे संघटनेच्या वतीने दहन करण्यात आले आहे. इंदोर येथील एका चौकात हे विरोध प्रदर्शन करण्यात आले. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून गदारोळ, गाण्यातील शब्द आणि दीपिकाची भगवी बिकनी यावरून सोशल मीडियावर गदारोळ सुरू झाला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तमदास मिश्रा यांची चित्रपटावर राज्यात बंदी घालण्याची धमकी दिलीय. गाण्यात दीपिकाने परिधान केलेली बिकिनी भगव्या रंगाची आहे. शिवाय या गाण्यात काही मादक मुव्ह्ज आहेत. ग्लॅमरस दिसणाऱ्या दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. शिवाय तिच्या लूकवरून मीम्सचा पाऊस पडताना दिसतोय. ट्विटरवर #Boycott Pathan हा ट्रेंड सुरु आहे. यामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पुढच्या वर्षी 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेत प्रदर्शित होईल. यशराज बॅनरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. दरम्यान, नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘बेशरम रंग’हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. जे सध्या प्रचंड चर्चेत आहे.
गीतकार कुमार यांचे हे गाणे विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केले आहे. शिल्पा राव कारलिसा मोंटेरियो यांनी गाण्याला आवाज दिला आहे. मात्र गाण्यातील दीपिकाच्या लूकवरून नेटकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आऊटफिटचा भगवा रंग असल्याने नेटकऱ्यांकडून विरोध होत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या गाण्याला सोशल मीडियावर अनेकांना उत्तम प्रतिसाद दिला, तर काहींना गाण्यातील बोल्ड सीन्समुळे चित्रपटाला ट्रोल करायला सुरुवात केली. अशातच आता अयोध्याचे महंत राजू दास यांनी देखील ‘पठाण’चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर ते म्हणाले की, मी प्रेक्षकांना मागणी करतो की, ज्या चित्रपटगृहांमध्ये ‘पठाण’चित्रपट दाखवला जाईल, ते देखील तुम्ही पाहू नका, असे आवाहन केलं जात आहे.
महंत राजू दास म्हणाले की, बॉलिवूड आणि हॉलिवूड सतत सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत असतात. कशा प्रकारे हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जाईल असा देखील ते प्रयत्न करत असतात. ‘पठाण’चित्रपटामध्ये दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकिनी घालून साधु संत आणि राष्ट्राच्या भगव्या रंगाचा अपमान केला आहे. ही गोष्ट दुःखद आहे.”
भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी तर बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या केशरी रंगाच्या बिकिनीतील दृश्यावर आक्षेप नोंदवला आहे. पठाण सिनेमात भगव्या रंगाची बिकिनी घालणे, म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या भगव्याचा अपमान होय, अशी टीका भाजपाच्या तुषार भोसले यांनी केली आहे. यानंतर हा वाद जास्तच पेटला आहे. आमचा स्वाभिमान असलेल्या भगव्या रंगाचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाहीत; ‘पठाण’ चित्रपटातील ‘ती’ दृश्य वगळावीत अन्यथा मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल!, असा इशारा तुषार भोसलेंनी दिला आहे. सातत्याने बॉलीवूड असो वा चित्रपटांच्या माध्यमातून हिंदुविरोधी लोकं त्यांचा हिंदुविरोधी अजेंडा चालवण्यासाठी अशी कृत्ये करत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले
वीर शिवाजी नावाच्या गटाने केलेल्या आंदोलनामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता शाहरुख खानचा पुतळा जाळण्यात आला.’पठाण’ या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे.
गाण्यातील काही दृष्य योग्य नाहीत असं राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार हा चित्रपट राज्यात प्रदर्शितकरायचा कि नाही ह्याबाबत विचार केला जाईल असंही मिश्रा यांनी म्हटलं. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटात दीपिकाच्या बिकिनीच्या रंगासह गाण्याच्या बोलांवरही आक्षेप नोंदवला आहे.
#WATCH | "Even now, questions are being raised on civil liberties and freedom of expression": Amitabh Bachchan at the 28th Kolkata International Film Festival pic.twitter.com/ycBY5LhRP2
— ANI (@ANI) December 15, 2022
1952 सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये सेंसरशीपचे स्वरूप काय असावे याबद्दल फिल्म सर्टिफिकेशन बोर्डाला निर्देश देण्यात आले आहेत. असे असून देखील आताही नागरी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, असे बच्चन म्हणाले आहेत.
‘बेशरम रंग’ गाण्यातील दीपिकाच्या भगवा रंगाच्या बिकीनीवरुन आक्षेप घेतला जात असतानाच काहींनीन याचे समर्थनही केले आहे. प्रकाश राज यांनी या वादात उडी घेत काही प्रश्न टिव्ट केले आहेत. प्रकाश राज म्हणतात, ‘हॅशटॅग बेशरम, भगवा परिधान केलेले बलात्कारी पुरुषाचा सन्मान करतात, भगवा घालून आमदार द्वेषपूर्ण भाषण करतात, दलाली करतात, भगवा परिधान केलेले स्वामी अल्पवयीन मुलांवर अत्याचार करतात तेव्हा तुम्हाला तो भगवा गैर वाटत नाही पण सिनेमातील एक भगवा रंगाचा ड्रेस गैर वाटतो. ‘
पायल रोहतगीने दीपिकाच्या बचावासाठी उडी घेतली आहे. त्यांनी हा वाद मूर्खपणाचा असल्याचे म्हटले असून रंग योग्य नाही म्हणून निशाणा साधू नये असे म्हटले आहे. मी ज्या रिअॅलिटी शोमध्ये होतो, आमचा युनिफॉर्मही त्याच रंगाचा होता. दीपिकाने बिकिनीमध्ये कोणत्याही देवाचे चित्र ठेवलेले नाही. यावर वाद निर्माण करणारे हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत आहेत. पायलच्या म्हणण्यानुसार, जिथे अश्लीलतेचा प्रश्न आहे, देशाने एका पॉर्न अभिनेत्रीला डोक्यावर घेतले आहे आणि त्यांना फक्त दीपिकाला अश्लील दिसत आहे.
● वादग्रस्त दृश्य व प्रसंग वगळण्यात येणार
‘हर हर महादेव’ चित्रपट झी मराठी वाहिनीवर 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील वादग्रस्त दृश्य व प्रसंग काढून टाकावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडने झी मराठीला केली होती. संभाजी ब्रिगेडची मागणी झी मराठीने मान्य केली आहे. झी मराठीकडून चित्रपटातील वादग्रस्त दृश्य व प्रसंग वगळण्यात येणार आहेत. चित्रपट प्रदर्शनापूर्वी झी मराठीने हा निर्णय घेतला आहे.