● ८ दिवसात ९ शाळा- महाविद्यालय कार्यालय आणि १३ गाळे सील
● मोहिमेतून ११ कोटींचा कर महापालिकेच्या तिजोरीत
Income tax collection of 11 crores from Abhay Yojana, payment of chiller of five thousand on the last day
Solapur Municipal Corporation
सोलापूर : महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेली नोटीस फी, दंड आणि शास्तीमधील ८० टक्के सूट देणारी विशेष अभय योजना गुरुवारी (ता. 15) मुदत संपल्याने ती आज शुक्रवार, १६ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अभय योजनेच्या शेवटच्या दिवशी रात्री ११ .१८ वाजेपर्यंत ४.१३ कोटी मिळकत कर वसूल झाला आहे. ८ दिवसात ९ शाळा – महाविद्यालय कार्यालय आणि १३ गाळे सील केली. मोहिमेतून ११ कोटींचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. आता संपूर्ण दंडाच्या रकमेसह थकीत मिळकत कर वसूल करण्यात येणार आहे.
सोलापूर महापालिकेच्या मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष पथकामार्फत शहरात मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या ८ दिवसाच्या मोहिमेत मिळकती सील आणि जप्ती कारवाईसह वसूल करण्यात आलेला ११ कोटी रुपयांचा थकीत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. आता संपूर्ण दंडाच्या रकमेसह थकीत मिळकत कर वसूल करण्यात येणार आहे, महापालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली
आता शुक्रवारपासून संपूर्ण दंडाच्या रकमेसह थकीत मिळकत कर वसूल करण्यात येणार असल्याचे व कारवाई मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली. महापालिकेच्या मिळकत कराची जुनी आणि चालू आर्थिक वर्षातील ६३६ कोटींची थकबाकी असल्याने महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने प्रथम ३ लाखावरील थकबाकी मिळकतदारांना मिळकतीशील व जप्ती कारवाई संदर्भात नोटीसा बजावल्या होत्या. मात्र नोटीसा मिळूनही सुमारे १ हजार २०० मिळकतदारांपैकी केवळ ३० मिळकतदारांनी आपला सुमारे ४ कोटी रुपयांचा थकीत कर जमा केला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यामुळे महापालिका प्रशासनाने थकबाकी मिळकतदारांना त्यांचा कर भरण्यास आकर्षित करण्यासाठी दि. १२ नोव्हेंबरपासून लावण्यात आलेल्या नोटीस फी, दंड आणि शास्तीमध्ये ८० टक्के सूट देण्याची विशेष अभय योजना जाहीर केली होती. प्रथम मुदत संपल्याने यामध्ये वाढ करून १५ डिसेंबरपर्यंत केली होती. ही योजना गुरुवारी विशेष आदेशाने रद्द करण्यात आली आहे. महापालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ व सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून पथकाने हे वसुली मोहीम राबवली.
□ लिलावाची पुढील कार्यवाही करण्यात येणार !
योजनेसह कराची वसुली करताना पथकाने शहरातील ९ शाळा- महाविद्यालय तसेच १३ गाळे सील केले. यादरम्यान तब्बल ११ कोटी २० लाख ६६ हजार ३८३ रुपयांचा कर वसूल केला आहे. आता यापूर्वी सीलबंद आणि जप्त करण्यात आलेल्या मिळकतींची मुदतीत १०० टक्के दंडासह थकबाकी महापालिकेत जमा न झाल्यास लिलावाची पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपायुक्त पोळ यांनी स्पष्ट केले.
○ पाच हजाराची चिल्लर देऊन कर भरणा
अभय योजनेच्या गुरुवारी शेवटच्या दिवशी एका मिळकतदाराने तब्बल ५ हजार रुपयांची चिल्लर देऊन महापालिका मिळकत कराचा भरणा केला. उशिरापर्यंत महिला कर्मचाऱ्यास चिल्लर मोजावी लागली.