अक्कलकोट : तालुक्यातील मैंदर्गी ते भोसगा कच्च्या रस्त्यावर धनगर स्मशानभूमीजवळ मोटारसायकलवर धान्याची रास करणाऱ्या मशीनची चढणवर पाठीमागे येऊन धडक बसुन मोटारसायकल वरील ३२ वर्षीय तरूण ठार झाला. हा अपघात आज शुक्रवारी (ता. 16) सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान झाला. Akkalkot. Bike rider killed in collision with grain harvester, Mandargi accident
शांतप्पा बिरप्पा पुजारी (वय-३२ वर्ष रा.मैंदर्गी) असे मृताचे नांव आहे. मयताचे वडिल बिरप्पा शंकरप्पा पुजारी (वय ६५ वर्ष रा. मैंदर्गी) यांनी पोलिसात फिर्याद दिली. याची अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात धान्य रास मशीन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज फिर्यादीचा लहान मुलगा शांतप्पा बिरप्पा पुजारी हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (क्रमांक एम.एच.१२के यु ४८२२ ) वरून मैंदर्गी ते भोसगा अशा कच्चा रोडने प्रांतविधीकरिता सकाळी जात असताना धनगर स्मशानभूमी मैंदर्गी जवळ आला असता त्याचे समोर रस्त्यावर असलेली एक मोठी हिरव्या रंगाची पंजाबची धान्याची रास करण्याची मशीन (क्रमांक ए.पी.२५ क्यु ८५५९ ) ही चढ चढत असताना अचानकपणे पाठीमागे आली.
त्या मशीनच्या अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून मोटारसायकल वरील मुलाला जोराचे धडक देवून गंभीर जखमी करून त्याचे मरणास व मोटारसायकलच्या नुकसानीस कारणीभूत झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सकाळी साडेआठ वाजण्याचे सुमारास फिर्यादी घरी असताना गावातील यलप्पा यांनी अपघाताची माहिती दिली. मोटारसायकल कच्चा रस्त्याच्या खाली चिलारीच्या झाडात पडलेली होती व तेथेच एक मोठी हिरव्या रंगाची पंजाबची धान्याची रास करण्याची मशीन उभी होती. प्रत्यक्षदर्शीनी शांतप्पा मोटरसायक्लवरून खाली रस्त्यावर पडला व त्याचे जवळील मोटरसायकल मशीनच्या धडकेने रस्त्याच्या डाव्या बाजुला चिलारीच्या झाडात पडली.
त्या मशीनचे मोठे चाक त्याचे शांतप्पाच्या पोटावरून जाऊन गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीस सांगितले. मशीनचा चालक पळून गेला होता. त्यानंतर सर्वानी शांतप्पा यास खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे उपचाराकरिता आणले असता तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. अधिक तपास पोलीस करत आहेत. मयत हा चालक म्हणुन काम करत होता. परिस्थिती हालाखीची असून पश्चात पत्नी , आई, वाडिल, दोन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 रात्री झोपताना पती – पत्नीचा गुपचूप व्हिडिओ काढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
● दरवाज्याच्या फटीतून चोरून व्हिडिओ शूट
सोलापूर : नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचे रात्रीच्या सुमारास शारीरिक संबंधाचे दरवाज्याच्या फटीतून चोरून मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग काढणाऱ्या शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी पीडित महिला ही आपल्या पती व नातेवाईकासमवेत शहरातील एका भागात राहते.बुधवारी दहा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण जेवण करून टीव्ही बघत बसले होते. मध्यरात्रीच्या सुमारास ते दोघे जोडपे एका रूममध्ये झोपले असताना शेजारी राहणाऱ्या तरुणाने दरवाज्याच्या फटीतून रूम मधील अशिल दृश्य काढले.
ही बाब त्या दोघांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घराबाहेरून पाहिले असता तो तरुण पळून गेला. पीडित विवाहितीने याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात त्या तरुणाच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.