सोलापूर – विजेचा शॉक बसल्याने २० वर्षाय तरुणी मरण पावली. ही घटना उ. सदर बझार परिसरातील अशोक नगर येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. ती लॅब टेक्निशियन बनण्यासाठी अभ्यास करीत होती. Solapur. Young girl dies due to electric shock, dreams of becoming a lab technician remain incomplete North Sadar Bazar
श्रद्धा बाबासाहेब बनसोडे (वय २०) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ती छतावरील कपडे काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी तारेचा स्पर्श झाल्याने ती बेशुद्ध पडली. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारपूर्वी मयत झाली.
श्रद्धा ही लॅब टेक्निशियनचा कोर्स करत होती. गुरूवारी परीक्षा असल्यामुळे ती सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसली. त्यानंतर ती सात वाजण्याच्या सुमारास घराच्या गच्चीवर गेली. त्यावेळी तेथील बांधकामासाठी असलेल्या पिलरमधील बारला हात लागल्यानंतर तिला विजेचा शॉक बसला. तिला वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
मयत श्रद्धा हिच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बझार पोलिसात झाली आहे.
● सेंट्रल बँक परिसरात तलवारीने मारहाण तरुण जखमी
सोलापूर – सलगर वस्ती परिसरातील सेटलमेंट फ्री कॉलनी येथे पूर्वीच्या भांडणावरून तलवार आणि हॉकी स्टिक केलेल्या मारहाणीत वसंत सदाशिव हातागळे (वय २९ रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं.६) हा तरुण जखमी झाला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हरीश मारुती जाधव आणि त्याचा भाऊ सतीश जाधव या दोघांनी मारहाण केली. अशी नोंद सलगर वस्ती पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ मद्रे येथे तलवारीने मारहाण दोघे जखमी
सोलापूर – कामासाठी जात असताना वाटेत अडवून तलवार आणि लाथाबुक्याने केलेल्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले. ही घटना मद्रे (ता.दक्षिण सोलापूर) येथील नदीच्या बंधाऱ्याजवळ गुरुवारी सकाळच्या सुमारास घडले घडली.
प्रकाश गुलाब पवार (वय ४३) आणि त्याचा भाऊ सुनील गुलाब पवार (रा. आनंदनगर, मद्रे) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ते दोघे सकाळी सात वाजेच्या सुमारास कामासाठी निघाले होते. सीना नदीच्या बंधाऱ्याजवळ त्यांना अडवून तमन्ना शंकर सोनकटले आणि त्याचा मुलगा संतोष या दोघांनी मारहाण केली. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
● स्पिड ब्रेकर वरून पडलेल्या महिलेचा मृत्यू
सोलापूर – मुलाच्या दुचाकीवरून प्रवास करताना खाली पडून जखमी झालेल्या अलकाबाई दत्ता मोरे (वय ५३ रा. महालक्ष्मी नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) या शासकीय रुग्णालयात उपचार घेताना गुरुवारी पहाटे मरण पावल्या.
त्या ४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास मुलाच्या दुचाकी पाठीमागे बसून तोरंबा (जि.उस्मानाबाद) येथून सोलापूर कडे निघाल्या होत्या. तुळजापूरच्या अलीकडे स्पीड ब्रेकर वरून गाडी उडाल्याने त्या खाली पडून जखमी झाल्या होत्या. तुळजापूर येथे प्राथमिक उपचार करून त्यांना सोलापुरात दाखल करण्यात आले होते.
□ आहेरवाडी येथे आत्महत्येचा प्रयत्न
आहेरवाडी (ता.दक्षिण सोलापूर) येथे राहणाऱ्या सरदार चांदसाब शेख (वय ३१) याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. त्याला बंकलगी येथे प्राथमिक उपचार करून सिद्धाराम बाके (शेजारी) यांनी शासकीय रुणालयात दाखल केले. एक वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले होते. निराशेच्या भरात त्याने हा प्रकार केला, अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.