पंढरपूर : पुतणीच्या लग्नासाठी सोलापूरहून आलेल्या महिलेचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण भर दिवसा दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना पंढरीत घडली. लग्नाच्या मिरवणुकीत महिला सहभागी झाली होती. Pandharpur. Five tola ganthan lampas around a woman’s neck in a wedding procession
याबाबत आरती गंगाराम बंदगुल यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरती बंदगुल यांचे पंढरपूर हे माहेर असून शुक्रवारी आपल्या मावस बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी त्या येथे आल्या होत्या. शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लग्नाच्या मिरवणुकीसाठी त्या भक्ती मार्गावरील एलआयसी ऑफिस समोरून जात असताना पल्सर या दुचाकीवरून दोन तरुण आले. यापैकी पाठीमागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला.
25 ते 30 वयोगटातील या चोरट्यांनी त्यांच्या तोंडाला रुमाल बांधला होता. यामुळे त्यांची ओळख पटली नाही. सदर गंठण 52 ग्रॅमच्या असून याची दीड लाख रुपये किंमत करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार बिपीन ढेरे करीत आहेत. दरम्यान शहरात महिलांचे दागिने चोरीचे प्रमाण वाढले आहेत. यामुळे भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल
अकलूज : माझे तुझ्यावर प्रेम आहे . आपण लग्न करू, असे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी दिल्याप्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अकलूज पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , २१ वर्षीय युवतीची एक वर्षापूर्वी अल्ताफ तांबोळी याच्याशी ओळख झाली होती . त्याने एसआरपीएफमध्ये कामाला लागलो सांगून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगत युवतीशी मैत्री केली. तू मला फार आवडतेस , आपण दोघे लग्न करू , असे त्याने सांगितले. पण तिने नकार दिला. तरी युवतीशी जवळीक साधत अल्ताफ याने २७ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजता पोलीस भरतीची नवीन पुस्तके आली आहेत, त्याबद्दल तुला सांगायचे आहे , असे म्हणून एका मंदिराजवळ युवतीला बोलावून घेतले.
मी तुझ्याशी लग्न करीन , असे म्हणत मंदिराच्या मागील बाजूस नेऊन युवतीशी बळजबरीने अत्याचार केला. त्याबाबत कुठे बोलली तर तुला ठार मारीन, तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन, अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा त्याने माझ्यासोबत चल म्हणून तगादा लावल्याने अखेर युवतीने अकलूज पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. अकलूज पोलिसांनी अल्ताफ तांबोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास अकलूज विभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे हे करीत आहेत.