● 53 सरपंच तर 302 सदस्य उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात आज रविवारी २० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत ७९.३० टक्के मतदान झाले. यात पुरूष १४२१० व स्त्री १२२८९ व इतर १ असे एकूण २६ हजार ५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. Akkalkot: 79.30 percent polling for 20 gram panchayats, results on Tuesday
तालुक्यात होणाऱ्या २० ग्रामपंचायतीच्या २० थेट सरपंचपदासाठी ५३ तर १३८ सदस्यपदासाठी ३०२ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. याआधीच एकूण दहा ग्रामपंचायत मधून ३४ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. २० ग्रामपंचायतीसाठी पुरूष १७५८९ व स्त्री १५८२७ व इतर १ असे एकुण ३३ हजार ४१७ मतदार होते. त्यापैकी सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासात पुरूष २४७४ व स्त्री १९२७ एकुण ४४०१ असे १३.१६ टक्के मतदारांनी मतदान केले.
सकाळी साडेअकरापर्यंत पुरूष ५८६६ व स्त्री ५३२६ व इतर १ एकुण १११९३ असे ३३. ४९ टक्के मतदारांनी मतदान केले. दुपारी दीडवाजेपर्यंत पुरूष ९३५४ व स्त्री ९२०१ असे एकुण १८५५५ असे ५५.५३ टक्के मतदान झाले. साडेतीन वाजेपर्यंत पुरूष १२०७० व स्त्री ११४७३ असे एकुण २३५४३ असे ७०.४५ टक्के मतदान झाले. तर अंतिम साडेपाच वाजता एकुण पुरूष १४२१० व स्त्री १२२८९ व इतर १ असे एकूण २६५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकुण मतदानाची टक्केवारी ७९.३० इतकी आहे.
शेवटच्या एका तासात मतदानाचा वेग वाढला. काही ठिकाणी परगांवहून मतदार ट्रव्हल्स करून मतदानासाठी आले होते. सकाळच्या वेळेस मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.
राज्यातील सत्ताबदलानंतर होणाऱ्या या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागात चुरसपूर्ण वातावरणात उत्साहात मतदान झाले. सरपंचपदासाठी थेट मतदान होणार असल्याने निवडणुकीतील राजकीय पॅनलपेक्षा सरपंच पदाच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली. सर्वत्र शांततेत चुरशीने मतदान झाले.
वयोवृद्ध आजारी व्यक्तींना नातेवाईकांनी उचलुन मतदान केंद्रावर आणले तर सलगर येथे नवरदेव महेंद्र शटगार यांनी आधी मतदानाचा हक्क बजावला व अक्कलकोट येथे विवाहाला गेला. पोलीसांनी सर्वत्र कडक व चोख बंदोबस्त ठेवला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बोरगांव देशमुख,पालापूर, घोळसगांव , सुलतानपूर, अरळी, बोरेगांव, दर्शनाळ, दहिटणेवाडी, शिरवळवाडी, सदलापूर, शिरवळ, कोन्हाळी, हालचिंचोळी, अंकलगे, खानापूर, रुहेवाडी, आंदेवाडी ज, हत्तीकणबस , सलगर, नाविंदगी अशा २० ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक शांततेत चुरशीने झाले.काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले.
आधीच दहा ग्रामपंचायतीमधून नाविंदगी १०, रुद्देवाडी ०२,सलगर ०१, अंकलगी ०३,खानापूर०३, कोन्हाळी ०१, शिरवळ०८, शिरवळवाडी०१, दर्शनाळ ०४, घोळसगाव ०१ असे ३४ सदस्य यांची निवड बिनविरोध झाली आहे. उर्वरित सदस्यांचा भविष्य आज मतपेटीत बंद झाले. मंगळवार २० डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. तालुक्यातील सलगर, बोरगांव दे, हत्तीकणबस, घोळसगांव, दर्शनाळ, दहिटणेवाडी, कोन्हाळी, खानापूर, रूद्धेवाडी, नाविदंगी येथे चुरशीने मतदान झाले तर शिरवळ येथे कमी मतदान झाले.
हत्तीकणबस येथे तीन मतदान केंद्रावर साडेतीन वाजेपर्यंत सुमारे ८० टक्के मतदान झाले. विद्यमान सरपंच श्रीशैल नंदर्गी विरूद्ध श्रीशैल माळी यांच्यात चुरशीने लढत होत आहे व अपक्ष शंकर माळी हेही नशीब आजमावत आहेत. सलगर येथे दुपारी चार वाजेपर्यंत ८० टक्के पेक्षा शांततेत चुरशीने मतदान झाले.सलगर येथे ९० वर्षीय सिध्दमलय्या स्वामी याला उचलुन मतदार केंद्र येथे मतदानासाठी नातेवाईकनी आणले. सलगर येथील नवरदेव महेंद्र शटगार यांने प्रथम मतदानाचा हक्क बजावला व नंतरच विवाहाच्या बोहल्यावर चढला.
अक्कलकोट तालुक्यात रविवार १८ डिसेंबर रोजी २० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक शांततेत ७९.३० टक्के मतदान झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार बाळासाहेब सिरसट यांनी सांगितले. यात पुरूष १४२१० व स्त्री १२२८९ व इतर १ असे एकुण २६५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत मतदान झाले.