□ चंद्रकांतदादांनी स्वतःची घेतली फेसमास्क लावून काळजी
मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना सांगवीत एका कार्यक्रमात शाईफेक करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पाटील सावधान झाल्याचे पाहायला मिळाले. Pimpri Chinchwad face mask for minister Chandrakant Patil पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी खबरदारी म्हणून चेहऱ्यावर थेट प्लास्टिकचं मास्क लावल्याचे बघायला मिळाले. याशिवाय धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आला.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. त्यांचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात आला.
संतप्त भावनेतून पिंपरी चिंचवड येथे भीमसैनिकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. ही शाई त्यांच्या चष्म्यावर पडली, त्यांचा डोळा वाचला. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. तरीही भीमसैनिकांमध्ये त्यांच्याबाबत रोष कायम आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी पुन्हा शाईफेकीची धमकी आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी खबरदारी म्हणून की काय फेसमास्क लावत पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ राज्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
महाराष्ट्र राज्यातील 7751 ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. या निवडणुकीची मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार असून, विजयाचा गुलाल कोणा कोणाच्या अंगावर पडेल?, याचे चित्र मंगळवारी दुपारपासून स्पष्ट होईल. दरम्यान, सर्वांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांच्या 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5. 30 या वेळेत मतदान होईल. या निवडणुकीची मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार असून, विजयाचा गुलाल कोणा-कोणाच्या अंगावर पडेल?, याचे चित्र 20 डिसेंबरला स्पष्ट होईल. सर्वांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
》 पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा धिंगाणा
मुंबई- बीदर एक्सप्रेस काल पुणे स्थानकावर प्रवाशांनी रोखून धरली. लातूरला जाणाऱ्या प्रवाशांनी ही रेल्वे रोखली होती. ही रेल्वे मुंबईहून येतानाच भरुन आली होती. पुणे स्थानकावर रेल्वेतील प्रवाशांनी रेल्वेचे दारच उघडले नाही. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी आंदोलन केले. काहींनी तर रेल्वे रुळावरच झोपले. यानंतर रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. यामुळे रेल्वे लातूरला दोन तास उशीरा आली.