मुंबई : राज्यात 18 हजार जागांसाठी पोलिस भरती होणार आहे. पोलीस दलात शिपाई आणि चालक पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी 15 डिसेंबरपर्यंत 18 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस भरतीसाठी 2 जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे. Maharashtra Police Bharti : Police Recruitment – 18 lakh applications for 18 thousand posts; Field test from January 2, but special notice…
विशेष म्हणजे या पोलिस भरतीमध्ये तृतीयपंथीयांनाही संधी देण्यात आली आहे. पोलीस शिपाई पदासाठी 68 आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी पाच तृतीयपंथीचे अर्ज आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज दाखलक करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. या तारखेपर्यंत 18 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले आहेत. तर चालक पोलीस हवालदार 2 लाख 15 हजार 132 अर्ज आले आहेत.
राज्यातील चालक व पोलीस शिपाई पदाच्या 18331 जागांसाठी 18 लाख 27 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदवारांना 22 डिसेंबरपासून परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलवर पाठवले जाणार आहे. तर 2 जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे. ज्या उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत त्या उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी मैदानी व लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये पोलीस शिपाई पदाच्या एकूण 17130 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विभागातील पोलीस शिपाई पदाच्या 14956 आणि चालक पोलीस शिपाई पदाच्या 2174 जागा आहेत. एसआरपीएफ पोलीस शिपाई पदाच्या 1204 पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले. पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती.
महाराष्ट्र पोलीस विभागाकडे 18 हजार 331 रिक्त पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. हे अर्ज पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी आहेत. पोलीस भरती प्रकियेत तृतीयपंथीयांना अर्ज भरण्यासाठी परवानगी दिल्यानंतर तृतीयपंथीयांनीही उमेदवारी अर्ज दाख केले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 68 आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी पाच तृतीयपंथीचे अर्ज आले आहेत. भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर होती परंतु ऑनलाइन प्रक्रियेत काही गैरसोय झाल्यामुळे ही तारीख 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
पण विशेष सूचना : भरती प्रक्रिया वेळी जरी विद्यार्थ्यांनी स्टेरॉईडचा वापर केला असला तरी भरतीमध्ये मेडिकल टेस्ट केली जाते आणि यामध्ये त्याचा अंश सापडला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचा अवलंब करू नये. निवड चाचणी वेळी मेडिकल टेस्ट मध्ये स्टेरॉईड किंवा इतर घटकांचा अंश सापडला तर भविष्यात विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी परीक्षा देता येणार नाहीत.
विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने तयारी केलेली आहे , त्या तयारीवर विश्वास ठेवून त्यांनी भरती प्रक्रिया पूर्ण करावी त्यातूनच त्यांची निवड होणार आहे. जर स्टेरॉईड सारख्या इंजेक्शनचा वापर करून अग्नीवीर होण्याची किंवा पोलीस भरती होण्याची इच्छा असेल त्यांना मात्र भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होणार यात शंका नाही.
□ 15 डिसेंबर 2022 पर्यंत प्राप्त झालेले एकूण अर्ज
पोलीस शिपाई आणि चालक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या
– पोलीस शिपाई पदासाठी 12,25,899 अर्ज आले आहेत. त्यापैकी 2,29,246 महिला आणि 68 तृतीयपंथी आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 14,956 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
– चालक पोलीस हवालदार पदासाठी 2,15,132 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यापैकी 9,883 महिला आणि 5 तृतीयपंथी आहेत. चालक पोलीस शिपाई पदासाठी 2,174 रिक्त जागासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.
– एसआरपीएफ (SRPF) म्हणजे राज्य राखीव पोलीस दल भरतीसाठी 3,71,507 पुरुषांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. SRPF दलात 1,201 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
– पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि एसआरपीएफ या तीनही पदांसाठी प्राप्त झालेले एकूण अर्ज 18,12,538 आहेत. यापैकी 94,245 उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरलेले नाही. 19 डिसेंबरला डेटा फ्रीज करण्यात येणार आहे.