सोलापूर : सोलापूर शहरातील नावाजलेले तरूण डॉक्टर असद मुन्शी यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. आता यात पत्नी, मेहुण्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. Solapur. Dr. Case registered against 5 persons including wife in Asad Munshi suicide case
आत्महत्येस कारणीभूत धरत मयताच्या पत्नी, मेव्हणा, सासऱ्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अहमद शाहनवाज मुन्शी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. मुंशी यांनी स्वतःला इंजेक्शन देऊन त्यांनी आपले जीवन यात्रा संपवली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिल्याची माहिती समोर आली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉक्टर असद मूंशी यांची पत्नी फलकनाज नजीरअहमद सय्यद, सरफराज नजीरअहमद सय्यद, नजीरअहमद सय्यद, निखत सरफराज सय्यद, सर्व राहणार मोहिते नगर, शगुन अपार्टमेंट होटगी रोड सोलापूर व डॉक्टर मिलिंद सरोदे (रा. जळगाव) यांचा समावेश आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
फिर्यादीत म्हटले आहे की, सर्वांनी संगनमत करून फिर्यादीचे भाऊ मयत डॉक्टर असद मुंशी यांना मानसिक त्रास देऊन तसेच डॉक्टर मुंशी हे त्यांच्या मुलीला पाहण्यासाठी गेले असता त्यावेळेस मुलीला पाहू न दिल्याने डॉक्टर असद मुंशी यांना मानसिक त्रास झाला. त्यामुळे ते आत्महत्येस प्रवृत्त व्हावे म्हणून त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला गेला व तसेच डॉक्टर मिलिंद सरोदे यांनी देखील फिर्यादी यांचा भाऊ असद मुंशी यांना फोनवर फलकनाज हिच्यासोबत माझे प्रेम संबंध आहेत असे बोलून मानसिक खच्चीकरण केले होते.
या सर्वाच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांचा भाऊ असद मुन्शी यांनी दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत.
परिवाराने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एक विडिओ देखील रेकॉर्ड केला होता. डॉ. असद मुन्शी यांचे बंधू अहमद मुन्शी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या या फिर्यादीवरून मृत डॉ. मुन्शी यांच्या पत्नी फलकनाज नजीरअहमद सय्यद, मेहुणा डॉ. सरफराज नजीरअहमद सय्यद, सासरे नजीरअहमद सय्यद, निखत सरफराज सय्यद आणि डॉ. मिलिंद सरोदे यांच्यावर भांदवि 306, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत.