● महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी काढले आदेश
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागाचे कामकाज प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांना विभाग (खाते) वाटप करण्यात आले आहे. विभाग वाटपाचे आदेश महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी काढले आहेत. Allotment of Departments to Additional Commissioners, Deputy Commissioners and Assistant Commissioners of Municipal Corporation Shital Teli – Ugle
दरम्यान, नवे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे सहा तर दुसऱ्या अतिरिक्त आयुक्त विजय खराटे यांच्याकडे एकूण सात विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आकृतीबंधानुसार महापालिकेअंतर्गत नगर अभियंता पदावरून पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती झालेले संदीप कारंजे हे अभियंता असल्याने त्यांना तांत्रिक विभागांची जबाबदारी मिळेल अशी शक्यता महापालिका प्रशासकीय वर्तुळात वर्तवली जात होती.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग शहर सुधारणा विभाग नगररचना कार्यालय बांधकाम परवानगी विभाग आदी तांत्रिक समजले जाणारे हे विभाग अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. बहुतांश महत्त्वाची खाती कारंजे यांना सोपविण्यात आली नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम 69 अन्वये नियुक्त प्राधिकारी यांच्याकडे महापालिका आयुक्त यांच्या नियंत्रण व पुनर्विलोकनाच्या अटीस अधिन राहून विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागाच्या कामकाजाचे पुनर्विलोकन करून यापूर्वी सोपविण्यात आलेल्या विभागात बदल करण्याचे योजिले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 40 अन्वये खात्यांचे व विभागाचे प्रशासन आणि संबंधित खात्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या निरनिराळ्या प्रकरणात असलेल्या विविध तरतूदीखाली नमूद केलेले कामकाज, महानगरपालिका आयुक्तांचे सर्वसाधारण नियंत्रणाखाली संबंधित अधिका-यांकडे सोपविण्यात आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ अधिकारी व त्यांना सोपविण्यात आलेले विभाग याप्रमाणे
– अतिरिक्त आयुक्त – 1 (शासन नियुक्त ) – विजय खोराटे यांच्याकडे विविध साथ विभाग सोपविण्यात आले आहेत. 1) सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर सुधारणा विभाग, प्रकल्प अधिकारी 2) नगर रचना कार्यालय व बांधकाम परवानगी विभाग 3) मुख्यलेखापाल विभाग 4) सामान्य प्रशासन विभाग 5) वाहन विभाग 6. निवडणूक विभाग 7) आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभाग आदी.
अतिरिक्त आयुक्त – 2 – ( म.न.पा. अधिकाऱ्यांमधून पदोन्नत) – संदिप कांरजे यांच्याकडे सोपविण्यात आलेले विभाग असे – 1) पाणी पुरवठा व ड्रेनेज विभाग 2) विद्युत विभाग 3) नगर सचिव विभाग 4) संगणक विभाग 5) विधी विभाग 6) प्राणी संग्रहालय पशु वैद्यकीय विभाग आदी.
उपायुक्त 1 (शासन नियुक्त ) – मच्छिंद्र घोलप यांच्याकडे सोपविण्यात आलेले विभाग याप्रमाणे – 1) सार्वजनिक आरोग्य विभाग- घनकचरा व्यवस्थापन विभाग 2) सुरक्षा विभाग 3) अभिलेखापाल कार्यालय
4) यु.सी. डी. कार्यालय (एनयूएलएमसह )
5) क्रीडा व सांस्कृतिक विभाग 6) अतिक्रमण विभाग
7) पर्यावरण विभाग 8) जनगणना कार्यालय 9) उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण विभाग 10) विभागीय कार्यालय क्र.: 2 आदी.
उपायुक्त – 2 – ( शासन नियुक्त प्रतिनियुक्तीवर ) – विद्या पोळ यांच्याकडे सोपविण्यात आलेले विभाग असे – 1) भूमी व मालमत्ता विभाग ( जाहिरात परवाना, हुतात्मा स्मृती मंदिरसह) 2) महिला व बाल कल्याण विभाग 3) कामगार कल्याण व जनसंपर्क कार्यालय व दिव्यांग कल्याण विभाग 4) मालमत्ता कर विभाग (शहर, शहर हद्दवाढ, ग.व.सु.) 5) वैद्यकीय आरोग्य विभाग (एनयुएचएमसह) 6) मलेरिया विभाग (आरोग्याधिकारी मार्फत) 7) प्राथमिक शिक्षण मंडळ व प्रशाला 8) मंडई (कोंडवाडा) व लायसन्स विभाग 9) विभागीय कार्यालय क्र.: 1, 10) भांडार विभाग ( सामान्य व आरोग्य ) 11) जन्म-मृत्यू विभाग व विवाह नोंदणी कार्यालय आदी.
सहाय्यक आयुक्त 1 (शासन नियुक्त) – पुष्पगंधा भगत – 1) विभागीय कार्यालय क्र.: 4, 5, व 6 , 2) सामान्य प्रशासन विभाग 3) महिला व बालकल्याण विभाग 4) विधी विभाग 5) संगणक व माहिती तंत्रज्ञान विभाग आदी.
सहाय्यक आयुक्त – 2 – (शासन नियुक्त) – विक्रमसिंह पाटील – 1) विभागीय कार्यालय क्र. 3, 7 व 8 , 2) निवडणूक विभाग व जनगणना कार्यालय 3) सार्वजनिक आरोग्य विभाग / घनकचरा व्यवस्थापन विभाग 4) भूमी व मालमत्ता विभाग ( जाहिरात परवाना हुतात्मा स्मृती मंदिरासह ) 5) मंडई (कोंडवाडा) व लायसन्स विभाग 6) अभिलेखपाल कार्यालय 7) कामगार कल्याण व जनसंपर्क कार्यालय व दिव्यांग कल्याण विभाग 8) यू.सी.डी. ( एनयूएलएमसह) आदी.
□ जबाबदारी नीट पार पाडली नाही तर आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांना विविध विभागाचे वाटप करण्यात आले. तसा आदेश ही महापालिका आयुक्तांनी काढला. दरम्यान, नूतन अतिरिक्त आयुक्त कारंजे यांच्याकडे ते टेक्निकल विभागातील असतानाही त्यांच्याकडे तो विभाग दिला नाही.
महत्त्वाची खाती देण्यात आली नसल्याचे विचारले असता पालिका आयुक्त शितल तेली -उगले म्हणाल्या, आता जी विभागाची जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी नीट पार पाडली नाही तर भविष्यात त्याचा विचार करून तो विभाग दुसऱ्यांना दिला जाईल. आवश्यकतेनुसार बदल करता येऊ शकतो. अतिरिक्त आयुक्त पद हे प्रशासकीय आहे. तांत्रिक नाही असेही त्यांनी सांगितले.