मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आधी आमदार नंतर नवीन चिन्ह शिंदेंना मिळाले. त्यानंतर आता शिवसेनेचे कार्यालयही शिंदेंकडे गेले आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडत आहे. येथील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले. Now party office to Shinden group, Thackeray father-son photos also deleted Nagpur winter session
शिवसेना पक्ष ठाकरे आणि शिंदे गटांत विभागला गेल्यामुळे यावर्षी विधीमंडळाच्या ठिकाणी शिवसेनेचे कार्यालय कुणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता लागली होती. ही व्यवस्था करतांना शिवसेनेचे मूळ कार्यालय हे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला देण्यात आले असून ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षासाठी दुसर्या कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदारांची संख्या पाहता हा बदल करण्यात आला आहे. कार्यालय मिळाल्यानंतर तेथील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा फोटो काढून टाकण्यात आला.
शिवसेनेचे कार्यालय सोडण्याची वेळ आली तेव्हा कार्यालयातील कर्मचारी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षानुवर्ष काम करत असलेल्या महिलांच्या डोळ्यात यावेळी अश्रु तरळले होते. दरम्यान 19 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर असं हे 10 दिवसीय अधिवेशन भरणार आहे. यंदाचं अधिवेशन वादळी असणार यात शंका नाही. कारण शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर नागपुरात होणारं हे पहिलं अधिवेशन आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्यभरातील नेते, मंत्री नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. २०१९ नंतर पहिल्यांदाच हे अधिवेशन नागपूरात पार पडत आहे. याआधी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात मोठा बदल करण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले आहे. आमदारांची संख्या पाहता हा बदल करण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटातील आमदारांसाठी संभाव्य व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला सामना बघायला मिळू शकतो.
● ‘सीमावासियांच्या योजना ठाकरेंनी बंद केल्या’
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या मुद्दयावरून गाजला. बाळासाहेबांच्या इच्छेनुसार आपल्याच मराठी बांधवांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे, असे उध्दव ठाकरेंनी म्हटले होते. यावर एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांमध्ये सीमावासियांच्या योजना बंद केल्या. तुम्हाला आता राजकारणासाठी बोलावे लागत आहे. मात्र सत्तेत असतांना सीमाभागातील बांधवासोबत भेदभाव करत वागलात जरा हे तपासून बघण्याचा सल्ला देत पलटवार केला आहे.